NCP Sharad Pawar Fourth list: राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर, सलील देशमुखांना उमेदवारी; या दोन मतदारसंघातील तिढा सुटेना

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने चौथी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत एकूण ७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर झाली आहे. पवार गटाने चौथ्या यादीत ७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने आतापर्यंत ८३ उमेदवार जाहीर केले आहेत. चौथ्या यादीत काटोल मतदारसंघातून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी

माण- प्रभाकर घार्गे
काटोल- सलील देशमुख
खानापूर- वैभव पाटील
वाई- अरुणादेवी पिसाळ
दौंड- रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा- संदीप बेडसे
अजितदादांचा कंठ दाटून आला, अश्रू अनावर झाले; पक्ष सोबतच कुटुंबात पडलेल्या फुटी बाबत केले जाहीर भाष्य

राष्ट्रवादीने चौथी यादी जाहीर केली असली तरी अद्याप माढा आणि वरुण मोर्शी या दोन मतदासंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. याआधी माण तालुक्यातील उमेदवार ठरत नव्हता. अखेर या यादीत माण तालुक्यातील उमेदवार जाहीर झाला. आता माढामधून कोणाला संधी दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही मतदारसंघाबाबत आज रात्रीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
विश्लेषण: बारामतीत अजित पवारांनी नारळ फोडला; लोकसभेसारखा खडा..! आता विधानसभेत सावध
माढा मतदारसंघातून ६ ते ७ उमेदवार इच्छूक आहेत. यामुळे माढाचा उमेदवार अद्याप ठरत नाही. त्याच बरोबर महाविकास आघाडीत वरुण मोर्शी हा मतदारसंघ शरद पवार गटाच्या वाट्याला आला असून येथील उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
Comments (0)
Add Comment