खालच्या पातळीवर टीका झाली, पण जयाताई रडली नाही, तुम्ही तर… लोणीत येऊन थोरातांचा विखेंवर घाणाघात

Maharashtra Election 2024: बाळासाहेब थोरात यांनी लोणी येथे झालेल्या सभेत विखे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीत थोरात विरुद्ध विखे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहिल्यानगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्यात जाऊन सभा घेण्याचा धडका सुरू केला आहे. आता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लोणी (ता. राहाता) या विखे यांच्या गावात सभा घेतली. शिर्डी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने ही सभा झाली. यावेळी थोरातांनी विखे पिता-पुत्रांवर घाणाघात केला.

थोरात म्हणाले, धांदरफळ येथील सभेत डॉ. जयश्री थोरात यांच्यावर झालेली टीका ही एकटीवर नसून तमाम माता भगिनींवर आहे. अत्यंत खालच्या पातळीवर टीका झाली तरीही जयाताई रडली नाही. आमच्या महिलांनी जाब विचारला तर तुम्ही पळून गेलात. त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांना विसरले. तुम्ही मर्द होता तर का लपून पळाले? वसंत देशमुख गळ्यात भाजपचा पट्टा घालून आक्षेपार्ह बोलत असताना डॉ. सुजय विखे टाळ्या वाजत होते. त्यामुळे या घटनेला तेच जबाबदार आहेत, असा हल्लाबोल थोरात यांनी केला.
NCP Sharad Pawar 4th Candidate list: राष्ट्रवादी शरद पवार गटाची चौथी यादी जाहीर, सलील देशमुखांना उमेदवारी; या दोन मतदारसंघातील तिढा सुटेना
यावेळी थोरात यांच्यासह नगरचे खासदार नीलेश लंके, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेनेचे सुहास वहाडणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात म्हणाले, संगमनेर तालुका चळवळीचा आहे. रागावत नाही आणि रागावला तर काय होते हे तुम्ही पाहिले आहे. ज्यांनी टीका केली ते विखे यांचा पट्टा बांधून फिरत आहेत. ते बोलताना तुम्ही टाळ्या वाजवत होता. नेत्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे समोरील लोक टाळ्या वाजवतात. या घटनेला तुम्हीच जबाबदार आहात. दहशत खरी राहता तालुक्यात आहे. एक वेळ विकासाबाबत आणि दहशतीबाबत तुलना होऊन जाऊ द्या, असे खुले आवाहनही थोरात यांनी दिले.
अजितदादांचा कंठ दाटून आला, अश्रू अनावर झाले; पक्ष सोबतच कुटुंबात पडलेल्या फुटी बाबत केले जाहीर भाष्य
थोरात म्हणाले, सध्या राज्याचे लक्ष संगमनेर आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाकडे लागले आहे. सर्वसामान्य जनतेत आनंद निर्माण करण्यासाठी ही लढाई आहे. संगमनेरच्या नादाला लागू नका. अंभोरे येथील सभेत नाटकी भाषणे सर्वांनी पाहिली आहेत. दहशतीचे आरोप आमच्यावर करता खरी दहशत कुठे आहे एकदा जनतेच्या न्यायालयात समोरासमोर होऊन जाऊ द्या. तुम्ही विरोधी बोलले म्हणून अनेकांचे हातपाय मोडले. अगदी फ्लेक्स सुद्धा लावू दिले जात नाहीत, इतकी तुमची दहशत आहे. जिकडे सत्ता तिकडे तुम्ही जाता सत्तेसाठी काही पण अशी तुमची वृत्ती आहे. महसूल मंत्री असताना शेती महामंडळाच्या जमिनी मी वाटल्या. निळवंडे धरण पूर्ण करून पाणी मी आणले. तुम्ही फक्त पाणी सोडले. अगदी ज्यांनी या कामात मदत केली त्या ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना तुम्ही धरणावर सुद्धा नेले नाही, अरे हा किती कृतघ्नपणा आहे. संगमनेर तालुक्यातील विरोधक सुद्धा आमचा आदर करतात. आम्ही त्यांना सन्मान आणि वागवतो, असेही थोरात म्हणाले.
राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणूनच निवडून येईन; अर्ज भरताना उमेदवाराने केला मोठा दावा, २०१९चे आहे कनेक्शन
उमेदवार प्रभावती घोगरे म्हणाल्या, या परिसरातील हुकूमशाही संपवण्यासाठी मी गृहिणी उभी आहे. हे लोक संगमनेरमध्ये जाऊन ओरडून भाषणे करतात. पण इथे किती दहशत आहे, ते या सामान्य जनतेला विचारा. सरकार लाडक्या बहिणी म्हणते. मात्र या बहिणीची सुरक्षितता सरकार करत नाही. या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्वांनी आशीर्वाद द्या शेतकऱ्याची लेक, भिडणार थेट असे म्हणत त्यांनी विखे यांना आव्हान दिले.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Balasaheb Thoratvidhan sabha nivadnuk 2024अहिल्यानगरडॉ. जयश्री थोरातडॉ. सुजय विखेबाळासाहेब थोरातमहसूलमंत्री राधाकृष्ण विखे
Comments (0)
Add Comment