शिवसेनेची तिसरी यादी जाहीर, १५ उमेदवारांमध्ये भाजपच्या शायना एनसी यांचा देखील समावेश; वाचा संपूर्ण यादी

Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने १५ जणांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात शायना एनसी यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तिसऱ्या यादीत १५ जणांची नावे जाहीर केली आहे. यात मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कन्नडमधून दानवे कन्या संजना जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

सिंदखेडराजा- शशिकांत खेडेकर
घनसवांगी- हिकमत उढाण
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
कन्नड- संजना जाधव
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर- भाऊसाहेब कांबळे
नेवासा- विठ्ठलराव लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राउत
गुहागर- राजेश बेंडल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आतापर्यंत ८० उमेदवार जाहीर केले आहेत. उद्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे अजून किती उमेदवार शिवसेनेकडून जाहीर केले जाता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजपच्या उमेदवारांची संख्या १४६ इतकी झाली आहे.
भाजपकडून आणखी एक यादी, पण यावेळी स्वत:ची नाही तर मित्रांसाठी सोडल्या इतक्या जागा; आठवलेंना मिळाली एक जागा
शिवसेना शिंदे गटाने तिसऱ्या यादीत कल्याण ग्रामीण विधानसभेतून शहरप्रमुख राजेश मोरे यांना दिली उमेदवारी दिली आहे. यामुळे कल्याण ग्रामीण मध्ये तिरंगी लढत होणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेत मनसेने बिनशर्त पाठींबा देऊनही शिंदे गटाने मनसे आमदार राजू पाटील यांच्या समोर उमेदवार उभा केला आहे.

तिसरी यादी जाहीर करताना शिवसेनेने आपल्या मित्र पक्षांसाठी दोन जागा सोडल्याचे जाहीर केले. यात एक जागा जनसुराज्य पक्षासाठी तर दुसरी जागी राजश्री शाहुविकास आघाडीला देण्यात आली आहे. हातकणंगलेची जागी जनसुराज्य पक्षाला देण्यात आली असून येथून अशोकराव माने हे उमेदवार असतील तर शाहुविकास आघाडीला देण्यात आलेल्या शिरोळमधून राजेंद्र पाटील येड्रावकर हे उमेदवार आहेत.

विखेंचे स्वप्न भंगले

संगमनेरची जागा एकनाथ शिंदे गटाकडे गेल्याने तेथून विधानसभा निवडणूक लढविण्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे स्वप्न भंगले. गेल्या काही काळापासून त्यांनी संगमनेर मध्ये आक्रमकपणे तयारी केली होती. मात्र पक्षाने ही जागा शिंदे गटाला सोडली आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra election 2024विधानसभा निवडणूक २०२४शायना एनसीशिवसेना बातम्याशिवसेनेची तिसरी यादी
Comments (0)
Add Comment