Maharashtra Election 2024: भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून भाजपकडून तसेच अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे.
राज्याच्या प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा विधानसभेसाठी महायुतीतर्फे शिंदे शिवसेनेला जागा सोडण्यात आली आहे. दुसऱ्या यादीत येथे शिंदे शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची आमदारकीचे तीन वर्ष अद्याप बाकी आहे. त्यातच आज अनेक दिवसांपासून डॉ. हिना गावित या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करू शकतात अशी चर्चा सुरू होती. अखेर आज त्याला पूर्णविराम मिळाला.
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खा.डॉक्टर हिना गावित यांनी भाजपातर्फे तसेच अपक्ष म्हणून दोन अर्ज दाखल केले. त्यांची लहान बहीण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनीही अर्ज दाखल केला. डॉ.हिना गावित यांनी सांगितले की, 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत काही होऊ शकतो. शिंदे शिवसेनेने विधान परिषदेचे आमदार यांना तिकीट दिले आहे. ते आमदार असताना पुन्हा आमदारकीचे निवडणूक लढवतील का असा सवाल करत याबाबत पक्षश्रेष्ठी विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या 35 वर्षापासून हा मतदार संघात एकच उमेदवार निवडून येत आहे. मात्र सर्वात मागास व सोयी सुविधा नसलेला . हा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता येथे परिवर्तन नक्की होणार आहे. उद्या दुपारपर्यंत ही जागा आम्हालाच मिळेल असे सांगत त्यामुळेच मी उमेदवारी दाखल केली आहे, असे यावेळी हिना गावित यांनी सांगितले. त्यामुळे ही जागा शिंदे शिवसेनेकडे राहील की भाजपाला मिळेल याकडे जिल्हावासियांच्या लक्ष लागून आहे.