‘महाराष्ट्रातला एकमेव लुटारू आमदार म्हणजे रत्नाकर गुट्टे,’ संजय जाधव बरसले

Sanjay Jadhav on Ratnakar Gutte: महाराष्ट्रातला एकमेव लुटारू आमदार हा गंगाखेडचा रत्नाकर गुट्टे आहे. या रत्नाकर गुट्टेंनी साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली लाखो शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकून ५ हजार कोटींची माया जमवली आहे, अशा लुटारू आमदाराला आता सत्तेतून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. असे खासदार संजय जाधव म्हणाले.

Lipi

धनाजी चव्हाण, परभणी : ‘महाराष्ट्रातला एकमेव लुटारू आमदार हा गंगाखेडचा रत्नाकर गुट्टे आहे. या रत्नाकर गुट्टेंनी साखर कारखाना काढण्याच्या नावाखाली लाखो शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकून ५ हजार कोटींची माया जमवली आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम याच आमदाराने केले आहे. त्यामुळे अशा लुटारू आमदाराला आता सत्तेतून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवार विशाल कदम यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता. पण आता त्या पराभवाचे उट्टे या २०१४ च्या निवडणुकीत आपल्याला काढायचे आहेत, असा खासदार संजय जाधव यांनी घणाघात केला आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर भव्य अशा रॅलीला संबोधित करताना खासदार संजय जाधव यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही यावेळी खासदार संजय जाधव यांनी केले.

खासदार संजय जाधव म्हणाले की, आमदार रत्नाकर गुट्टे हे भस्मासुर आहेत. या भस्मासुराचा नायनाट करण्याची वेळ आता आलेली आहे. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात कोणीच सुरक्षित नाही. लोकांच्या जमिनीवर कब्जे करणे, ओपन स्पेस हडप करणे, दादागिरी करणे अशी कामे हे आमदार करत आहेत. त्यामुळे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जीवन जगावे लागत आहे. आता नागरिकांना घाबरण्याचे कारण नाही, या निवडणुकीत मतदान करून या भस्मासुराचा नायनाट करा, असे आवाहन देखील खासदार संजय जाधव यांनी केले.

‘एकीकडे आमदार रत्नाकर गुट्टे सांगत आहे की, गंगाखेड शहरात १०० कोटी रुपयांचा निधी आणला. पण गंगाखेडमध्ये आज विकास कामे मात्र दिसत नाहीत मग हा १०० कोटी रुपयांचा निधी कोठे गेला हा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे. या मतदारसंघातील पोलीस प्रशासन देखील आमदार गुट्टे यांच्या सालगड्यासारखे वागत आहेत. दोन दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील महागाव या गावी आमदारांच्या पत्नी कोणतीही परवानगी न घेता सभा घेत होत्या. सभेला विरोध करणाऱ्या मराठा बांधवांवर मातंग कार्यकर्त्यांना हाताशी धरून ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील सर्वसामान्याशी असे वागू नये,’ असेही खासदार जाधव म्हणाले.

भव्य शक्तीप्रदर्शन विशाल कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे विशाल कदम यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने शिवसेनेकडून विशाल कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण विशाल कदम यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने पुन्हा एकदा विशाल कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मागच्या वेळेस विशाल कदम यांच्या पाठीशी भाजप होती पण आता यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस असा दुहेरी पाठिंबा असणार आहे. महाविकास आघाडीच्या बळावर विशाल कदम ही निवडणूक लढत आहे. त्यांनी आज भव्य असे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

mh vidhan sabha nivadnukratnakar guttersp candidate in parbhanisanjay jadhav shivsenashivsena ubtरत्नाकर गुट्टेंवर आरोप करणारे कोणराष्ट्रीय समाज पक्षाचे आमदारविधानसभेचा रणसंग्रामशिवसेना ठाकरे गटाचे खासदारसंजय जाधवांचा आरोप
Comments (0)
Add Comment