Vanchit Bahujan Aghadi : शिवसेनेचे संजय गायकवाड हे ६७ हजार ७८५ मते घेऊन विजयी झाले होते. २०१४मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ तिसऱ्या स्थानी होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीकडे लक्ष लागून आहे.
सदानंद माळी यांना वंचितची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी तयारीला सुरुवात केली. रविवारी अचानक वंचित बहुजन आघाडीकडून वाघोदे यांचे नाव जाहीर करण्यात आले. एकीकडे वंचितकडून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलला जातो आणि ओबीसीचाच उमेदवार बाजूला केला जातो, असा संताप माळी यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. २०१९च्या निवडणुकीत बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढलेले विजयराज शिंदे यांनी ४१ हजार ७१० ही दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. शिवसेनेचे संजय गायकवाड हे ६७ हजार ७८५ मते घेऊन विजयी झाले होते. २०१४मध्ये निवडून आलेले काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ तिसऱ्या स्थानी होते. त्यामुळे वंचितच्या उमेदवारीकडे लक्ष लागून आहे.
माळी अपक्ष अर्ज भरणार
माळी म्हणाले, आपल्याला नाकारलेली उमेदवारी ही ओबीसी समाजावर अन्याय करणारी आहे. माळी समाज सगळ्यात मोठा असून त्यांची मते निर्णायक ठरतात. मला ‘वंचित’ने बुलढाण्यातून ओबीसीचे नेतृत्व म्हणून संधी दिली. पण, त्यांनीच अविश्वास दाखविला, तो का? अशी नाराजी माळी यांनी व्यक्त केली. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी अपक्ष अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार यांनी घेतली जरांगेंची भेट
भीम आर्मीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले सतीश पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटीत भेट झाली. या भेटीनंतर ‘वंचित’मध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलाच्या घडामोडी घडल्याचे बोलले जात आहे.