भाजपची चौथी यादी जाहीर, अखेर नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमधून उमेदवारी जाहीर

BJP Fourth Candidate List: भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अजचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती आणि इतर सर्वच पक्ष आपल्या उर्वरित जागांवर उमेदवार जाहीर करत आहेत. त्यातच महायुतीमध्ये जागावाटपाच्या प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. यादरम्यान भाजपने आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे. यासह भाजप उमेदवारांची संख्या आता १४८ वर पोहोचली आहे.

भाजपच्या चौथ्या यादीत दोन उमेदवारांची घोषणा

भाजपच्या चौथ्या यादीत मुंबईतील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उमरेड (अनुसूचित जाती) मतदारसंघातून सुधीर पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Shrinivas Vanga: गाडी, ड्रायव्हर सगळं इथेच, एकटेच पायी निघून गेले, १२ तासांपासून वनगांचा पत्ता नाही, पत्नीची चिंता वाढली

मीरा भाईंदरचा तिढा सुटला, भाजपच्या नरेंद्र मेहतांना उमेदवारी

मीरा भाईंदर मतदारसंघावरुन महायुतीत पेच वाढला होता. येथील विद्यमान आमदार गीता जैन या २०१९ मध्ये अपक्ष लढून आल्या. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा मतदारसंघ नेमका कोणाच्या पारड्यात पडणार हा प्रश्न होता. या मतदारसंघातून गीता जैन आणि नरेंद्र मेहता इच्छुक होते. उमेदवारी मिळावी यासाठी या दोघांनीही सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर या मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्यात आला असून नरेंद्र मेहता यांच्या नावाची घोषणा झाली आहे.

उमरेडही भाजपच्या पारड्यात, सुधीर पारवेंना उमेदवारी जाहीर

त्याचप्रमाणे नागपूर विभागातील उमरेड विधानसभा मतदारसंघाचा तिढाही सुटला आहे. येथून भाजपच्या सुधीर पारवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. येथीन शिंदेसेनेच्या उमेदवाराला संधी मिळावी यासाठी शिवसेना आग्रही होती. पण, भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला आहे.

BJP Candidate List: भाजपची चौथी यादी जाहीर, अखेर नरेंद्र मेहतांना मीरा भाईंदरमधून उमेदवारी जाहीर

उमरेड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक प्रयत्न केले. पण, अखेर भाजपने ही जागा आपल्याकडे खेचली आणि नागपूर विभागातील रामटेक वगळता १२ पैकी ११ विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या पारड्यात आले.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Bjp Candidate Listelection 2024maharashtra assembly election 2024vidhan sabha nivadnuk 2024नरेंद्र मेहताभाजप उमेदवार यादीमहायुती उमेदवार यादीविधानसभा निवडणूकविधानसभा निवडणूक 2024सुधीर पारवे
Comments (0)
Add Comment