वडगाव शेरीत BJPच्या जगदीश मुळीक यांचा यू-टर्न, देवा भाऊंचा एक फोन अन्…

Jagdish Mulik Withdraw our Candidate: ‘मी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. पक्षाकडून मला एबी फॉर्म देखील देण्यात आला होता.

हायलाइट्स:

  • माझ्या नेत्याचा मला फोन आला
  • वडगाव शेरीत BJPच्या जगदीश मुळीक यांचा यू-टर्न
  • देवेंद्र फडणवीसांचा एक फोन आणि…
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
जगदशी मुळीक

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. महायुती आणि महाविकास आधाडीमधील सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यादरम्यान, अनेक उमेदवारांचा हिरमोड देखील झाला आहे. काही उमेदवारांनी बंड करत अपक्ष दाखल करुन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होताना पाहायला होईल असं वाटत होते. दरम्यान, आता पुण्यातील चर्चेत असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघात देखीले मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार होती. जगदीश मुळीक विरुद्ध सुनील टिंगरे अशी ही लढत होण्याची शक्यता होती. मात्र आता जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनाचा पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल ती जागा त्या पक्षात देण्याचा एक सूत्र महायुतीने ठरवल्याचे म्हटले जाते. दरम्यान, त्यानुसार वडगाव शेरीमध्ये टिंगरे यांना तिकीट देण्यात आले. मात्र भाजपकडून माजी आमदार मुळीक हे देखील निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया थांबवल्याचे मुळीक यांनी सांगितले.
Ajit Pawar: केसानं गळा कापायचे धंदे! फडणवीसांनी ‘ती’ सही दाखवली! अजितदादांचे आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप

जगदीश मुळीक म्हणाले, ”मी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरण्यासाठी आलो होतो. पक्षाकडून मला एबी फॉर्म देखील देण्यात आला होता. मात्र, प्रक्रिया सुरू असताना माझे नेते देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला महायुतीचा धर्म पाळायचा आहे फॉर्म भरू नका. मी आता कुठलाही फॉर्म भरणार नाही, मला माझ्या नेत्यांनी आश्वासित केलं आहे, मला न्याय दिला जाईल. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सतत फिल्डवर कार्यरत राहीन”, असा आत्मविश्वास जगदीश मुळीक यांनी यावेळी दर्शवला.

पुण्यातील नाराजी दूर

दुसरीकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले शहराध्यक्ष धीरज घाटे आणि पर्वतीमधून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांची नाराजी दूर करण्यात भाजपला यश आलं आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

devendra fadnavis jagdish mulik phonejagdish mulik candidacy withdrawjagdish mulik newspune marathi newspune vadgaon sheri constituencyजगदीश मुळीक उमेदवारी मागेजगदीश मुळीक बातम्यादेवेंद्र फडणवीस जगदीश मुळीक फोनपुणे मराठी बातम्यापुणे वडगाव शेरी मतदारसंघ
Comments (0)
Add Comment