खोके-खोके करणाऱ्या उद्धवजींना आता काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागतो हे दुर्दैव, रामदास कदमांची टीका

Ramdas Kadam criticized Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे. खोके सरकार म्हणणाऱ्या उद्धवजींना काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागतोय, हे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

प्रसाद रानडे, रत्नागिरी : विधानसभा निवडणुकांचे रणांगण तापले असून महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्टार प्रचारक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेल्या शिवसेनेचे नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांचा समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी खोके खोके खोके करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या ४० आमदारांना बदनाम करण्याचा षडयंत्र रचलं होतं. या ४० आमदारांपैकी एकही आमदार निवडून येणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र मला सांगायला आनंद होतो आहे की आता या ४० आमदारांच्या विरोधात उमेदवार उभा करण्यासाठी उद्धवजी यांना काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागतो आहे हे उद्धव ठाकरे यांचं दुर्दैव आहे.

ते पुढे म्हणाले की, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात ज्या महिला भगिनी आता उभ्या आहेत, त्यांनी काँग्रेसमधूनही आणि वंचितमधूनही उमेदवारी मागितली होती. शेवटी उद्धवजींनी उमेदवारी दिली. अशी आता इतकी वाईट अवस्था उद्धवजी यांची महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
Thane News : अपेक्षांचा ‘दिवा’ विझला, उमेदवारी नाकारल्याने शिवसेना शहरप्रमुख नाराज; ‘कल्याण ग्रामीण’मध्ये नाराजीनाट्य

पक्षाने माझी नियुक्ती स्टार प्रचारक म्हणून केली

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, मालेगावचे मंत्री महोदय दादा भुसे यांचा फॉर्म भरण्यासाठी मी गेलो होतो, त्या वेळेला दोन्ही ठिकाणी प्रचंड अशा जाहीर सभा झाल्याची माहिती रामदास कदम यांनी दिली आहे. पण मला आनंद होत आहे, की पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून माझी स्टार प्रचारक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर दोन नंबरचा नेता म्हणून नियुक्त केली आहे.

महाराष्ट्रभरात चांगले वातावरण आहे. मी आणखी जवळपास ४० जाहीर सभा महाराष्ट्रात घेणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेले अडीच वर्ष घेतलेले २०० मोठे निर्णय हे लोकाभिमुख ठरले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही देखील शेवटच्या घटकापर्यंत घराघरात पोहोचली आहे. मला विश्वास आहे की की किमान ७० आमदार तरी कमीत कमी राज्यभरात हे शिवसेनेचे निवडून येतील.
Nagpur News : महाविकास आघाडीत बिघाडी! शिवसेनेच्या विरोधात काँग्रेस उमेदवाराचा अपक्ष अर्ज, जागावाटपानंतर मोठा राडा

ठाकरेंना पश्चात्ताप होईल

उद्धवजी यांना काँग्रेसबरोबर गेल्याचा पश्चाताप होईल, की मी काँग्रेस बरोबर जाऊन चूक केली, असं त्यांना वाटेल. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराच्या विरोधात गेल्यावर काय होतं हे त्यांना कळेल, अशा शब्दात कदम यांनी समाचार घेतला आहे. शिवसेनाप्रमुखांनी संघर्षातून हा पक्ष मोठा केला. त्यांनी काँग्रेसबरोबर यात संघर्ष केला, शरद पवार साहेबांबरोबर संघर्ष केला. आज उद्योजक शरद पवार यांच्या मांडीवर बसून दिल्लीमध्ये सोनियाजींना हुजरे करून या हुजरेगिरीमुळे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची पायमल्ली त्यांनी केली आहे. याचं प्रायश्चित्त या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना भोगावे लागेल.

खोके-खोके करणाऱ्या उद्धवजींना आता काँग्रेसमधून उमेदवार आयात करावा लागतो हे दुर्दैव, रामदास कदमांची टीका

शिवसेना प्रमुखांच्या आत्म्यालाही याचे दुःख होत असेल. जो पक्ष मी मोठा केला जे विचार मी दिले या सगळ्याच्या विरोधात जाऊन उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला कसा काय बांधू शकतात? असा प्रश्न शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला पडला असेल, दुःख होत असेल, याचं आपल्यालाही दुःख होत आहे, वाईट वाटत आहे, अशी खंत कदम यांनी यावेळी व्यक्त केली.

खेडमध्ये ठाकरे सेनेला दणका

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला भगदाड पडले असून खेड शहर प्रमुख दर्शन महाजन यांनी मंगळवारी शिवेसना नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीत जामगे येथे शिवसेनेत प्रवेश केला. शहराध्यक्ष कुंदन सातपुते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी महाजन यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, तालुका प्रमुख सचिन धाडवे, चंद्रकांत कदम, पप्पू चिकणे, संजय मोदी, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

CM Eknath ShindeEknath ShindeRamdas KadamUddhav Thackerayvidhan sabha ratnagiriआमदार संजय गायकवाडउद्धव ठाकरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेरामदास कदमविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment