उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर महायुती, महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली; ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज

Maharashtra Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाले आहेत. आता सर्वांचे लक्ष ४ नोव्हेंबरवर असणार आहे. कारण अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर देखील महाविकास आघाडी आणि महायुतीची डोकेदुखी संपलेली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून जागावाटपाची चर्चा सुरू होती. ही चर्चा अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सुरू होती. दोन्ही आघाड्यात असलेल्या सर्व पक्षांमधील इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने अनेक मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.

अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यातील २८८ मतदारसंघात ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल झाले आहेत. आता ३० ऑक्टोबरला छाननी होणार असून ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. तोपर्यंत दोन्ही आघाडीतील नेत्यांना बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
पती रवी राणांचा अर्ज भरताना नवनीत राणा झाल्या भावूक; केले मोठे वक्तव्य, माझ्या पराभवामुळे…
राज्यातील अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये बोरिवली मतदारसंघातून भाजपचे संजय उपाध्याय विरुद्ध शिवसेनेची लढत होणार आहे. यात गोपाल शेट्टी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. शेट्टी हे भाजपच्या तिकीटावर दोन वेळा खासदार होते.उमरेडमधून भाजपचे सुधीर पारवे विरुद्ध काँग्रेसचे संजय मेश्राम यांच्यासोबत राजू पारवे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेने शिंदे गटाचे मुरजी पटेल विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे ऋतुजा लटके यांच्यासोबत अपक्ष म्हणून स्वीकृती शर्मा यांनी अर्ज दाखल केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातले जनरल डायर; रोहित पवारांची सडकून टीका, भाजपच्या सर्व्हेचा म्हणतो- आमचा उमेदवार…
चिंचवडमधून भाजपचे शंकर जगताप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्यासोबत नाना काटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. मानखुर्दमधून शिवसेनेचे सुरेश पाटील विरुद्ध समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यासोबत नवाब मलिक देखील रिंगणात आहेत.असेच चित्र पंढरपूरमध्ये देखील आहे,येथे भाजपचे समाधान आवताडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनिल सावंत यांच्यासोबत काँग्रेसचे भगीरथ भालके हे देखील मैदानात उतरले आहेत.
अनेकांना उपमुख्यमंत्री केले, पण सुप्रियाला एकही पद दिले नाही; शरद पवारांचा अजितदादांना टोला- सर्व सर्वाधिकार दिले मात्र…
परंडा मतदारसंघातून तानाजी सावंत यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे रणजीत पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तिघे रिंगणात आहेत. सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे अमर पाटील यांच्यासोबत अपक्ष म्हणून अपक्ष म्हणून दिलीप माने यांनी अर्ज दाखल केले आहेत.

काटोलमधून शरद पवार गटाचे सलील देशमुख विरुद्ध भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरेश अरसडे हे देखील मैदानात उतरले आहेत.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly election 2024Vidhan Sabha Nivadnukमहायुतीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment