निवडणूक निरीक्षक डॉ. हीरा लाल यांचा मतदारांशी संवाद – महासंवाद




मुंबई, दि. 29 :- मतदार जागृती कार्यक्रम अंतर्गत 172- अणुशक्तीनगर आणि 173- चेंबूर विधानसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ. हीरा लाल यांनी वडाळा येथील भक्ती पार्क येथे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी डॉ. लाल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.

हरित निवडणुकीच्या संकल्पनेवर भर देत केंद्रीय सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक डॉ. लाल यांनी पर्यावरण रक्षण करत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे तसेच झाडे लावण्याचेही आवाहन केले. यावेळी डॉ. लाल यांनी नवमतदारांसह ज्येष्ठ नागरिक मतदार यांच्याशीही संवाद साधला. यावेळी उपनिबंधक सुनिल बनसोडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

—–०००—–

केशव करंदीकर/विसंअ/







Source link

Comments (0)
Add Comment