मलबार हिल निवडणूक कार्यालयाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक अंजना एम. यांची भेट – महासंवाद




मुंबई, दि. २९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मुंबई शहर जिल्ह्यातील १८५-मलबार हिल विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाला केंद्रीय निवडणूक निरीक्षक अंजना एम. यांनी भेट देऊन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी मलबार हिल मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी कामकाजाविषयी माहिती दिली.

केंद्रीय निवडणूक निरीक्षक अंजना एम. यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया, एक खिडकी योजना, सी-व्हिजिल ॲप, एनजीएसपी, खर्च नोंदवही, स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्र व साहित्य वितरण कक्षाची पाहणी केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत आढावा घेतला.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनकुमार पोतदार, केंद्रीय निवडणूक निरीक्षक अंजना एम. यांचे संपर्क अधिकारी नंदकुमार परब, बकुळा माळी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

शैलजा पाटील/विसंअ/







Source link

Comments (0)
Add Comment