Diwali 2024: अपेक्षेपेक्षा जवळपास ४० टक्के अधिक खरेदी-विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी माहिती दिली.
त्यानिमित्ताने मंगळवारी झवेरी बाजारात गर्दी होती. अपेक्षेपेक्षा जवळपास ४० टक्के अधिक खरेदी-विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत झवेरी बाजार येथील मुंबई ज्वेलरी असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमारपाल जैन यांनी माहिती दिली. ‘यंदा सोन्याने उच्चांकी दर गाठल्याने वास्तवात खरेदी चांगली, परंतु सामान्य असेल, असा अंदाज होता. संपूर्ण देशात ३५ ते ४० टन सोने उलाढालीची शक्यता असताना तब्बल ५५ टन सोने खरेदी झाली. मुंबईतील हा आकडाही मोठा होता. प्रारंभी केवळ लहान दागिन्यांची खरेदी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. प्रत्यक्षात सोन्याच्या बिस्किटांपासून कानातले डुल, अंगठ्या व मंगळसूत्राचीही खरेदी झाली,’ असे त्यांनी सांगितले.
३५ हजार कोटींची उलाढाल
धनत्रयोदशीनिमित्ताने देशभरात ३५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (कॅट) राष्ट्रीय सचिव शंकर ठक्कर यांनी सांगितले. महामुंबईतील हा आकडा दोन हजार कोटी रुपयांच्या घरात होता. त्यात सोने-चांदीसह वाहनखरेदी, इलेक्ट्रॉनिक्स सामान, कपडे, सजावटीच्या वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू यांचा समावेश होता.