Vidhan Sabha Nivadnuk: श्रीरामपूर ते बदनापूर, मित्रपक्षच समोरासमोर, युती-आघाडीत कुरघोड्या, कोणकोणत्या मतदारसंघांत चुरस?
महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागवाटपाचा घोळ मंगळवारी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम होता. यातून पक्षांतर्गत वाद, मित्रपक्षांतील कलह वारंवार समोर आले. राज्यभरात २२ ठिकाणी मित्रपक्षच परस्परांसमोर रिंगणात उतरल्याचे स्पष्ट झाले. आता निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झालेले नाराजीनाट्य अर्ज मागे घेण्याच्या म्हणजेच चार नोव्हेंबरपर्यंत काय वळण घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.