आली दिवाळी आली दिवाळी.. दिवाळी आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

Diwali 2024 Quotes In Marathi: आज १ नोव्हेंबर २०२३ शुक्रवार रोजी दिवाळी आणि लक्ष्मी पूजन आहे. दिवाळीची ही पहाट अभ्यंगस्नाने होते. यादिवशी दीपावली,  लक्ष्मी- कुबेर पूजन या सर्वांनी आनंद द्विगुणीत होईल. तेव्हा या दिवाळीनिमीत्त खास शुभेच्छा तुमच्यासाठी देत आहोत. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा..

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Diwali Wishes 2024: आली दिवाळी आली दिवाळी.. शुभेच्छा देण्यासाठी या संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. या दिवाळीनिमीत्त आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रींणीना शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा संदेश.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

“धनलक्ष्मी,धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दीपावलीत या अष्टलक्ष्मी, तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत
लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा”

“दिव्यांच्या लख प्रकाशाने
उजळलेली आजची रात्र आहे,
आपण सर्व मिळून हा
पवित्र सण साजरा करूया,
कारण आज सर्व सणामधील सर्वात
मोठा सण दिवाळी आहे
आपणास व आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा”

दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा

“दिवाळी आहे पर्व सुखांचं, प्रकाशाचं
लक्ष्मी आपल्या घरी येण्याचं
या दिवाळीला तुम्हाला मिळो आयुष्यभराचा आनंद
लक्ष्मी पूजन, नरक चतुर्थी आणि
दिवाळी पहाटेच्या मनपूर्वक शुभेच्छा”

दिपावलीच्या हार्दिक शभेच्छा

“लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणरायाचा निवास असो,
आणि माता दुर्गेच्या आशीर्वादाने
आपले जीवन नेहमी उजळून जावो,
लक्ष्मीपूजनाच्या खूप सा-या शुभेच्छा!”

दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा

“दिव्यांमुळे मिळेल आनंदाचा प्रकाश,
संपत्ती आणि मनःशांती…
लक्ष्मीपूजनाच्या पावन
पर्वावर उघडेल भाग्याचं दार,
दिवाळी आणि लक्ष्मीपूजन शुभेच्छा २०२३”

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Dipawali 2024 Wishesdiwali 2024Diwali 2024 MessagesDiwali 2024Quotesdiwali and lakshmi pujan Imagesदिवाळी आणि लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छादिवाळीच्या शुभेच्छा २०२४
Comments (0)
Add Comment