समाजासाठी मुख्यमंत्र्यांशी भिडले, भाजपचा राजीनामा दिला, माजी मंत्र्यांचा जुन्या मतदारसंघात नवा डाव

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची तारीख आता संपली आहे. अनेक ठिकाणी जुन्या दिग्गज नेत्यांनी आपापल्या पद्धतीने निवडुकीसाठी फासे टाकले आहेत. अशाच प्रकारे माजी मंत्र्यानेही आपल्या जुन्या मतदासंघात डाव टाकला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महेश पाटील, नंदुरबार : धनगर समाजाला आदिवासीमधून आरक्षण देणार असल्याची चर्चा सुरू असताना समाजासाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारत माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी भाजपाचा राजीनामा दिला होता. अखेर त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली. दरम्यान या मतदारसंघाच्या विभाजनाआधी ते या ठिकाणाहून दोन वेळेस आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे अनेक नेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी हे तीन वेळेस आमदार राहिले आहेत. खा.राहुल गांधी हे नंदुरबार येथे 2024 मध्ये आले असता त्यावेळी पद्माकर वळवी यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. शहादा- तळोदा विधानसभा मतदार संघातून ॲड.पद्माकर वळवी यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये काँग्रेसकडून निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळाले होते. 2014 व 2019 मध्ये त्यांचा विधानसभेत पराभव झाला. पद्माकर वळवी विद्यार्थी चळवळीचे नेते असून राज्यात आदिवासींच्या आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. .दरम्यान धनगर आरक्षणाविरोधात आदिवासी जनसमुदायातर्फे आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. दरम्यान धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण देण्यात येईल अशी चर्चा असताना याबाबत सरकारने अद्याप ठोस भूमिका न घेतल्याने पद्माकर वळवी यांनी भाजपचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यासोबत विधानसभा लढवणार असल्याचे विधानही त्यांनी केले होते. मात्र कोणत्या पक्षातर्फे उमेदवारी करणार हे मात्र गुलदस्त्यात होते. अखेर त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केली.

जुन्या मतदारसंघात नवा डाव

माजी मंत्री पद्माकर वळवी हे 1999 तसेच 2004 मध्ये अक्कलकुवा-तळोदा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडून आले होते. मात्र राज्यात मतदारसंघाचे पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे हा मतदारसंघाचे विभाजन झाले. त्यामुळे 2009 मध्ये पद्माकर वळवी यांनी शहादा- तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी ते विजयी झाले होते. पुन्हा 2024 मध्ये जुन्या मतदारसंघात त्यांनी भारतीय आदिवासी पार्टी (बाप ) तर्फे उमेदवारी करत नवा डाव टाकला आहे. त्यांच्या उमेदवारी विविध नेत्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

AkkalkuvaAkkalkuva marathi newsNadurbarpadmakar valviPadmakar Valvi Marathi Newsनंदुरबारपद्माकर वळवी
Comments (0)
Add Comment