दिवाळीचा बाजार करुन परतताना काळाचा घाला, टेम्पोची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Kolhapur Accident News: या अपघातात संजय यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सुरेखा यांना जखमी अवस्थेत त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.

हायलाइट्स:

  • दिवाळीचा बाजार करुन परतताना काळाचा घाला
  • टेम्पोची दुचाकीला धडक
  • पती-पत्नीचा मृत्यू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
कोल्हापूर अपघात बातम्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील राधानगरी येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दिवाळीचा बाजार करुन घरी परतणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला. येळवडे ते राशिवडेदरम्यान एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव टेम्पोने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अखेर उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. संजय वसंत कांबळे (वय ४८) आणि सुरेखा संजय कांबळे (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. मृत दाम्पत्याला चार मुली असून ते राधानगरीतील पुंगाव येथे वास्तव्यास होते. संजय यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय होता. तर, त्यांची पत्नी भोगावती-परिते येथे एका दुकानात कामाला होत्या, दरम्यान, संजय आणि सुरेखा हे मंगळवारी संध्याकाळी दिवाळीची खरेदी करून घरी परतत होते. मात्र, राशिवडे-येळवडेच्या सीमेवर आल्यानंतर येळवडेकडून माल उतरून राशिवकडे निघालेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, संजय आणि सुरेखा जवळपास ३० फुट लांब फरपटत गेले आणि टेम्पो उजव्या बाजूच्या नाल्यात पडला.
Prashansa Ambere : राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेचा पहिला उमेदवार छाननीत बाद, कारण आश्चर्यकारक

या अपघातात संजय यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी सुरेखा यांना जखमी अवस्थेत त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशीरा दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत दाम्पत्याचा चार मुली आहेत. त्यांच्यापैकी एका मुलीचा विवाह झाला. ती बाळंतपणासाठी माहेरी आली आहे. उर्वरित तीन मुली अनुक्रमे पाचवी, आठवी आणि बारावीत शिकत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

accident newskolhapur accident newskolhapur latest marathi newsradhanagari tempo and bike accidentअपघात बातम्याकोल्हापूर अपघात बातम्याकोल्हापूर लेटेस्ट मराठी बातम्याराधानगरी टेम्पो आणि बाईक अपघात
Comments (0)
Add Comment