वडगावशेरीत नवा ड्रामा, नाव एक उमेदवार दोन, अपक्षामुळे शरद पवारांची चिंता वाढली

Vidhan Sabha Elections Vadgaon Sheri: विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वडगाव शेरी हा विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. आता उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही पुन्हा याच मतदारसंघाची चर्चा सुरु झाली आहे. या मतदारसंघात एकाच नावाचे दोन उमेदवार असल्याने शरद पवारांची चिंता वाढली आहे.

Lipi

पुणे : पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वात नाट्यमय घडामोडी घडणारा विधानसभा मतदारसंघ ठरला आहे. सुरवातीला उमेदवार ठरवण्यावरून महायुतीत धुसफूस झाली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जगदीश मुळीक हे पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि जगदीश मुळीक फॉर्म न भरताच माघारी फिरले. गेल्या आठ दिवसांपासून नाट्यमय घडामोडी सुरू असताना आज अर्ज छाननीच्या पहिल्याच दिवशी देखील नवीन ड्रामा वडगाव शेरीत पाहायला मिळाला.

वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे (शप) उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या सारखंच नावं असणाऱ्या व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर राष्ट्रवादीच्या बापूसाहेब पठारे यांनी आक्षेप घेतला होता. मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील असणारे बापू बबन पठारे यांनी काल वडगाव शेरीमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. बापू बबन पठारे यांनी आपल्या उमेदवारी अर्जात कर्जाचा तपशील, बँक खाते, बँक खात्यात किती रक्कम यापैकी कशाचाच उल्लेख केला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादीच्या बापू पठारे यांनी घेतला होता.

या अर्जाची आज छाननी करण्यात आली. छाननी केल्यानंतर बापू बबन पठारे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे. बापू बबन पठारे यांचा उमेदवारी अर्ज हा नियमानुसार वैध ठरवण्यात आला असल्याची माहिती वडगाव शेरीचे निवडणूक अधिकारी सचिन बावसकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात दोन बापू पठारे असणार आहेत.

Pune Elections: वडगावशेरीत नवा ड्रामा, नाव एक उमेदवार दोन, अपक्षामुळे शरद पवारांची चिंता वाढली

दरम्यान, विरोधी उमेदवाराला पराभव समोर दिसत असल्याने त्यांना अशा पद्धतीने डमी उमेदवार उभा करावा लागत असल्याची टीका सुरेंद्र पठारे यांनी केली आहे. वडगाव शेरीचे दुसरे प्रमुख उमेदवार यांचे बंधू हे बापू बबन पठारे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, फॉर्म भरायला आले त्यावेळेसच त्यांनी कदाचित आपला पराभव मान्य केला असेल त्यामुळे या असल्या घटना करण्याची त्यांच्यावर वेळ आली असल्याची टीका देखील सुरेंद्र पठारे यांनी केली आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

nivadnuk batmyasharad pawar ncpVadgaon Sherividhan sabha electionsबापू पठारेवडगाव शेरीविधानसभा निवडणूकशरद पवार
Comments (0)
Add Comment