Raj Thackeray Reaction on Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत राज ठाकरे त्यांनी बांधकाम क्षेत्रात अशा गोष्टी वाढत असल्याचं म्हटलं. माझ्या हातात सरकार देऊन पाहा असंही ते म्हणाले.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधान केलं आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, की मुंबईत ज्याप्रकारे बांधकाम क्षेत्रात हे सर्व होत आहे, ते प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सर्वांनाच सांभाळून गोष्टी करणं गरजेचं आहे. ते एबीपीच्या शिखर सम्मेलन कार्याक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, की मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आपल्या पोलिसांनी केवळ ४८ तास दिले आणि सांगितलं की मुंबई साफ करा, तर इथे कोणीही राहणार नाही. अशी साफसफाई हवी असेल, तर एकदा त्यांच्याशी बोलून बघा. त्यांना सगळं काही माहिती आहे. केवळ ४८ तासांत सगळं साफ होईल.
कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले, आपल्याकडे कायदा, लॉ आहे पण ऑर्डर मिळत नाही. माझ्या हातात सरकार द्या, एकदा माझ्या हातात सरकार देऊन पाहा, मी ४८ तासांचा नारा दिला नाही तर बोला… सर्व काही साफ होऊ शकतं.
Raj Thackeray : माझ्या हातात सरकार देऊन पाहा, ४८ तासांत… बाबा सिद्दीकींच्या हत्येबाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
माजी मंत्री बाबा सिद्दीकींची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे इथे त्यांच्या मुलाच्या झिशान सिद्दीकीच्या ऑफिसबाहेर तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. दसऱ्याच्या दिवशी सेलिब्रेशन सुरू असताना, फटाके फोडले जात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलं असून पोलीस अनेक प्रकारे या गोळीबाराप्रकरणात तपास करत आहेत.