Raj Thackeray on Mumbai Unwanted Lighting : राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत मुंबई शहराला डान्सबार बनवत आहेत का? असा सवाल केला आहे.
विधानसभेआधी राज ठाकरेंनी एबीपीच्या शिखर संम्मेलनात बोलताना मुंबईतील अनावश्यक रोषणाईवर भाष्य केलं. ही मुंबई आहे की डान्सबार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत, मुंबईला डान्सबारमध्ये बदलत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. मुंबईला सौंदर्यपूर्ण बदलाची गरज आहे. मुंबईला मोठी संग्रहालयं, उद्यानांची गरज आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी विजेच्या खांबांसह सगळीकडेच दिवे लावल्याचं मी पाहिलं आहे, हे शहर आहे की डान्सबार? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे शहरातील लायटिंगबाबत बोलताना म्हणाले, मुंबईत आताच सगळीकडे, प्रत्येक ठिकाणी लायटिंग लावली गेली, तर सरकार काय सणासुदीच्या काळात त्या बंद करणार का? असं म्हणत खऱ्या अर्थाने शहर सुधारण्याची समज त्यांच्यात नाही, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली. तसंच महाराष्ट्राच्या विकासावर चर्चा तासंतास चालू राहू शकते आणि या चर्चांमध्ये राज्यासाठी काय करता येईल याचा विचार करता येऊ शकतो, असंही ते म्हणाले.
Raj Thackeray : मुंबई शहर आहे की डान्सबार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, रोषणाईवरुन केलं लक्ष्य
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल
राज ठाकरे यांनी राज्यातील घडामोडींवरही भाष्य केलं. राज ठाकरे यांना महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण असतील? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी पुढचा मुख्यमंत्री भाजपमधून असेल, असं उत्तर दिलं. याचं कारण सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं भाजपचा पुढचा मुख्यमंत्री असेल, असं ते म्हणाले.