नका सोडू इमान! भाजपनं पाठवलं खास चार्टर्ड विमान; बंडखोरानं बायकोसोबत फोटो काढले छान अन् मग…

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. आता सगळेच पक्ष बंडखोरांच्या नाकदुऱ्या काढत आहेत. बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नगर: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा एकदा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे. त्यांना भाजपच्याच राजेंद्र पिपाडा यांनी थेट आव्हान दिलं आहे. पिपाडा यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपनं वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. बैलगाडीतून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या पिपाडा यांच्यासाठी पक्षानं मुंबईतून खास चार्टर्ड प्लेन पाठवलं आहे.

भाजप नेत्यांनी पिपाडा यांच्यासाठी शिर्डीला चार्टर्ड प्लेन पाठवलं. त्यांना या फ्लाईटनं मुंबईला बोलावण्यात आलं. पिपाडा आणि त्यांच्या पत्नी विमानानं मुंबईला रवाना झाले. राजेंद्र पिपाडा हे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक मानले जातात. ते फडणवीसांच्या सातत्यानं संपर्कात असतात. पण त्यांचं आणि विखे पाटलांचं कधीच जमलेलं नाही. दोघांमधील विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पिपाडा यांची काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी सलगी वाढली आहे. पिपाडा शिर्डीतून लढण्यास इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी विखेंच्या उमेदवारीला बराच विरोध केला. त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पत्रव्यवहार केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
Nawab Malik: मलिकांना तिकीट, नाराज फडणवीसांचा ‘बुलेट पाटलां’ना सपोर्ट; अजितदादांची गुगली, सस्पेन्स वाढला
मंत्री विखेंना उमेदवारी दिल्यास भाजपची एक जागा कमी होईल. त्यामुळे शिर्डीतील उमेदवार बदला, अशी मागणी पिपाडा यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर पिपाडांनी मतदारसंघातील संपर्क वाढवला. गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली. पण पक्षानं विखेंनाच पुन्हा तिकीट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या पिपाडा यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बैलगाडीतून जात अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नीनंही अपक्ष अर्ज भरला.

नका सोडू इमान! भाजपनं पाठवलं खास चार्टर्ड विमान; बंडखोरानं बायकोसोबत फोटो काढले छान अन् मग…

आता पिपाडा दाम्पत्याची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु करण्यात आले आहेत. पिपाडा यांना तातडीनं मुंबईला बोलावून घेण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी पक्षानं शिर्डीला खास चार्टर्ड विमान पाठवलं. या विमानातून ते मुंबईला गेले. २००९ मध्ये पिपाडा यांनी विखे पाटील यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा १३ हजार मतांनी पराभव झाला. २०१९ मध्ये विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

bjp rebelmaharashtra assembly electionMaharashtra Political NewsMaharashtra politicsradhakrishna vikhe patilदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र राजकीय बातम्याराजेंद्र पिपाडाराधाकृष्ण विखे-पाटीलशिर्डी विधानसभा मतदार संघ
Comments (0)
Add Comment