तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र

Jitendra Awhad Mumbra Kalwa Assembly constituency : कळवा, मुंब्र्यातील ५० गृहसंकुलांकडून डॉ. जितेंद्र आव्हाड यांना समर्थनाचे पत्र पाठवण्यात आले आहेत. आम्हीच तुमचे प्रचारक, १५ वर्ष तुम्ही केलेले कामच आता बोलत आहे, असे पत्र लिहिण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विनित जांगळे, ठाणे : एकीकडे प्रचारासाठी इमारतींचे मजले चढताना उमेदवारांना घाम फुटत असतानाच “तुमचे प्रचारक आम्हीच आहोत. तुम्ही प्रचार करू नका! गेल्या १५ वर्षात तुम्ही केलेले कामच आमच्याशी बोलत आहे. म्हणूनच आम्ही ही जनचळवळ उभी करत आहोत. तुम्ही राज्य पहा. आम्ही मतदारसंघ पाहतो. तुमची निवडणूक आम्ही हातात घेतो. तुतारी वाजवणारा माणूस घराघरात पोहचवतो,” अशा आशयाचे समर्थन पत्र महाविकास आघाडीचे मुंब्रा- कळवा येथील उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शप) राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांना मुंब्रा-कळवा येथील सुमारे ५० पेक्षा अधिक गृहसंकुलांनी दिले आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीच्या प्रचाराची बहुदा ही पहिलीच वेळ आहे.
Jitendra Awhad : गुरुप्रमाणे शिष्याचीही पावसात चिंब भिजत राजकीय फटकेबाजी, मुंब्र्यात भर पावसात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भाषण
जितेंद्र आव्हाड यांना मतदार संघातील गृहसंकुलांनी दिलेल्या पत्रात, गेली १५ वर्षे आम्ही तुम्हाला गल्लीबोळात फिरताना बघत आहोत. त्याचे चांगले परिणाम आम्हाला दिसू लागले आहेत. २००९ चे मुंब्रा, कळवा आणि आताचे मुंब्रा, कळवा यांच्यात जमीन – अस्मानाचा फरक पडल्याचे दिसत आहे. आमच्या घरांच्या किमती आणि राहणीमान प्रचंड उंचावले आहे. ही सर्व तुमचीच मेहनत आहे. म्हणूनच आमचे एकमताने तुम्हाला समर्थन आहे. तुम्ही आमच्या विभागात प्रचार करू नका. आम्हीच तुमचे प्रचारक आहोत. तुम्हाला प्रचाराची गरज नसून तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, असे म्हणत, आम्ही ही जनचळवळ सुरू करत आहोत, आता आमच्यासारख्या सामान्य जनतेने तुमची ही निवडणूक हातात घेतली आहे. त्यामुळे तुमचा प्रचार आम्ही करू; तुम्ही फक्त महाराष्ट्र फिरा, असे पत्र दिले आहे. त्यामुळे या मतदारसंघात प्रचारात रंगत आली आहे.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा
दरम्यान, कळवा – मुंब्रा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र मागील वर्षी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात शरद पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड मागील तीन टर्म सगल निवडून आले आहेत.

Jitendra Awhad : तुम्ही केलेले कामच सारं काही सांगत आहे, तुमचा प्रचार आम्ही करू; जितेंद्र आव्हाडांच्या समर्थनार्थ पत्र

या मतदारसंघात आव्हाडांना घेरण्याचे मनसुबे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरू केले असून आव्हाडांच्या विरोधात ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आता जितेंद्र आव्हाडांसाठी गृहसंकुलांनी केलेला प्रचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Jitendra Awhadjitendra awhad election campaignJitendra Awhad Mumbra Kalwa Assembly constituencyMumbra Kalwa Assembly constituencymumbra kalwa vidhan sabha nivadnukMumbra-Kalwaजितेंद्र आव्हाडजितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा प्रचारजितेंद्र आव्हाड मुंब्रा कळवा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment