राज्यात २६ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट! माजी राज्यमंत्र्यांनी सांगितली क्रोनोलॉजी

राज्यात २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होईल. त्यानंतर २६ तारखेला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येईल, असा खळबळजनक दावा माजी राज्यमंत्र्यांनी केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बुलढाणा: राज्यात पुढील महिन्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचा खळबळजनक दावा माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुबोध सावजी यांनी केला आहे. निवडणूक निकालानंतर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी तीन दिवसांत व्हावा लागेल. अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल, असं सावजी म्हणाले. सावजी यांनी महसूल राज्यमंत्रिपद भूषवलं असून ते अकोला, बुलढाण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागील हेतू, त्या कालावधीत घडू शकणाऱ्या घडामोडी यावर सावजी यांनी सविस्तर भाष्य केलं.

‘२०२४ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे. विधानसभेची मुदत ५ वर्षांची असते आणि ५ वर्षांच्या मुदतीच्या आत नवं मंत्रिमंडळ गठीत करावं लागतं. ही मुदत २५ तारखेला संपणार आहे. २० तारखेला मतदान आहे. २३ तारखेला निकाल जाहीर होईल. निकाल जाहीर झाल्यावर नवीन सदस्यांचा शपथविधी होणं आवश्यक आहे. तेव्हाच मंत्रिमंडळ गठीत होईल. २४ तारखेला शपथविधी आणि २५ तारखेला मंत्रिमंडळ गठित होणं गरजेचं आहे. तसं न झाल्यास २६ तारखेला राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल,’ असं सावजी यांनी सांगितली.
Devendra Fadnavis: भाजपचा CM होईल! राज ठाकरेंची थिअरी अन् फडणवीसांनी लगेच टाकली इन्स्टा स्टोरी, गाणंही लक्षवेधी
मंत्रिमंडळाचं गठन, त्यासाठी असणारी केवळ तीन दिवसांची मुदत यामागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. ‘राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केला. दौऱ्यानंतर ते दररोज सत्ताधाऱ्यांना अपडेट देत होते. राज्यातील जनतेच्या प्रतिक्रिया काही बरोबर नाहीत असं त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना सांगण्यात आलं. म्हणून सत्ताधाऱ्यांना रोज वाट्टेल ते निर्णय जाहीर करायला लावण्यात आले. करोडो रुपये जाहीर केले गेले. तिजोरीचा अभ्यास केला गेला नाही. सरकार केवळ प्रलोभनं देत गेलं,’ असं सावजी म्हणाले.
Raj Thackeray: निवडणूक निकालानंतर मनसेच्या मदतीनं…; भाजपबद्दल राज ठाकरेंचं भाकीत, रोखठोक भूमिका मांडली
‘निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांच्या संगनमतानं राज्यात एकाच तारखेला निवडणूक जाहीर केली. त्यानुसार २० नोव्हेंबरला मतदान होईल. २३ नोव्हेंबरला मतमोजणी आणि २४ नोव्हेंबरला नव्या सदस्यांचा शपथविधी होईल. २४ नोव्हेंबरला सगळ्या सदस्यांचा शपथविधी न झाल्यास २५ तारखेलाही होऊ शकतो. २५ च्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ गठीत न झाल्यास तर २६ च्या सकाळी राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात येईल, अशी क्रोनोलॉजी सावजी यांनी सांगितली.

राज्यात २६ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट! माजी राज्यमंत्र्यांनी सांगितली क्रोनोलॉजी

‘भाजप जर त्यांचा मुख्यमंत्री बनवण्याच्या स्थितीत असेल तर २५ तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल आणि भाजप जर त्या परिस्थितीत नसेल तर ते २५ तारीख टाळतील. म्हणजे २६ तारखेला राष्ट्रपती राजवट लागेल. राष्ट्रपती राजवट लागल्यावर डिसेंबर, जानेवारी या दोन महिन्यांत आमदार कशा पद्धतीनं आपल्या बाजूनं करायचे, खोके निती कशी वापरायची, फोडाफोड कशी करायची, याचा विचार करुन निवडणूक आयोगाला हाताशी धरुन हे कारस्थान रचण्यात आलेलं आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे,’ असं सावजी म्हणाले.

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly electionmaharashtra electionsMaharashtra politicspresident rulesubodh savjiभाजपमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेससुबोध सावजी
Comments (0)
Add Comment