भाजपने ‘टाईमबॉम्ब’ लावला! दिसतात 148, पण शिवसेनेत 8, राष्ट्रवादीत 4 उमेदवार पेरलेत, समीकरण काय?

Maharashtra Election : महायुतीत भाजपने १४८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र शिवसेनेत आठ, राष्ट्रवादीत चार उमेदवार पेरले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

म. टा. खास प्रतिनिधी, नागपूर/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी संपल्यानंतरही महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा पेच अजूनही कायम आहे. यातून पक्षांतर्गत वाद, मित्रपक्षांतील कलह वारंवार समोर आले. राज्यात विविध ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत बंडाचे झेंडे फडकले आहेत. विदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तसेच अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमने-सामने आहेत. निवडणूक जाहीर झाल्यापासून सुरू झालेले नाराजीनाट्य अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत काय वळण घेते, याकडे लक्ष लागले आहे.

समीकरण काय?

महायुतीत भाजपने १४८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र शिवसेनेत आठ, राष्ट्रवादीत चार उमेदवार पेरले आहेत. म्हणजेच भाजपचे उमेदवार शिवसेनेत प्रवेश करुन धनुष्यबाण किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांनंतर समीकरणं फिरली, तर हे १२ उमेदवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे तसं पाहता भाजपच्या उमेदवारांची संख्याही १६० वर आहे. भाजपला विधानसभेत १६० जागाच लढायच्या होत्या, परंतु जागावाटपाच्या तडजोडीत असा ‘चिन्हीय’ तोडगा निघाला. २८८ जागा असलेल्या विधानसभेसाठी बहुमताचा आकडा १४५ इतका आहे. अशावेळी निकालानंतर काहीही होऊ शकतं.

भाजपने ‘पाठवलेले’ उमेदवार

जागावाटपात भाजपने आपले अनेक उमेदवार शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडे पाठवले आहेत. भाजपने शायना एन. सी. (मुंबादेवी), मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), संजना जाधव (कन्नड), राजेंद्र राऊत (बार्शी), नीलेश राणे (कुडाळ), राजेंद्र गावित (पालघर) विलास तरे (बोईसर), संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व) हे उमेदवार शिवसेनेकडे पाठवले आहेत.

तर संजयकाका पाटील (तासगाव -कवठेमहांकाळ), निशिकांत पाटील (इस्लामपूर), राजकुमार बडोले (अर्जुनी -मोरगाव), प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) हे उमेदवार राष्ट्रवादीकडे धाडले आहेत.
C Voter Survey Maharashtra : मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, शरद पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?
पूर्व नागपूरची जागा राष्ट्रवादी (शप)च्या दुनेश्वर पेठे यांना सुटली असताना काँग्रेसचे माजी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे आणि संगीता तलमले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार)च्या प्रदेश सरचिटणीस आभा पांडे यांनी अर्ज भरला आहे. उत्तर नागपुरात काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात काँग्रेसचेच नगरसेवक मनोज सांगोळे यांनी बसपाचे तिकीट मिळविले आहे. मध्य नागपुरात काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या विरोधात काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी बंड पुकारले आहे. पश्चिम नागपूरमधून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी नरेश बरडे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

BJP Candidates : भाजपने ‘टाईमबॉम्ब’ लावला! दिसतात 148; पण शिवसेनेत 8, राष्ट्रवादीत 4 उमेदवार पेरलेत, समीकरण काय?

महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा)ला सुटलेल्या रामटेक मतदारसंघात विशाल बरबटेंनी अर्ज केला असतानाच, शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश धोपटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक तसेच चंद्रपाल चौकसे यांनीही अर्ज दाखल केला आहे. हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी (शप) गटाचे रमेश बंग यांच्या विरोधात त्यांच्याच गटाच्या उज्ज्वला बोढारे, वृंदा नागपुरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काटोल मतदारसंघात राष्ट्रवादी (शप)चे सलील देशमुख यांच्या विरोधात युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवल्क्य जिचकार यांनी अर्ज दाखल केला आहे. शेकापचे राहुल देशमुख यांनीही अर्ज भरला. भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या विरोधात भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याचे पती संदीप सरोदे यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार)कडून सुबोध मोहिते यांनी अर्ज दाखल केला आहे. उमरेडची जागा काँग्रेसला सुटली असताना त्यांच्याच पक्षाच्या दर्शनी धवड, मिलिंद सुटे यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे सुधीर पारवे यांच्या विरोधात शिवसेनेचे (शिंदे) राजू पारवे यांनी बंड केले आहे.
Prashansa Ambere : राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेचा पहिला उमेदवार छाननीत बाद, कारण आश्चर्यकारक
दिग्रसमध्ये काँग्रेसचे माणिकराव ठाकरे आणि शिवसेना (उबाठा)चे पवन जयस्वाल हे उमेदवार आमने-सामने आहेत. मोर्शीत भाजपने उमेश यावलकर आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना उमेदवारी दिली आहे. आघाडी आणि महायुतीत कुणीच माघारी घेतली नाही तर येथे दोन्ही आघाड्यांसमोर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय असेल. मात्र, ठाकरे गटाने यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी केली आहे. दिग्रसच्या जागेऐवजी ठाकरे गट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरची जागा घेणार आहे.

काँग्रेस मोठा भाऊ

महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेस मोठा भाऊ ठरला आहे. काही मतदारसंघात उमेदवारांची पुनरावृत्ती झाल्याने काँग्रेसचा जागांचा आकडा १०४ इतका झाला आहे. आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ९८ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८७ जागा मिळाल्या आहेत. तर आघाडीत समाजवादी पक्षाला शिवाजीनगर -मानखुर्द, भिवंडी पूर्व, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला कळवण आणि डहाणूची जागा मिळाली आहे. उमेदवारांच्या पुनरावृत्तीमुळे आघाडीतील तीन प्रमुख पक्षांच्या जागांचा आकडा २८८ इतका भरत आहे.

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

BJP Candidates ListMaharashtra electionMahayuti Seat SharingVidhan Sabha Nivadnukभाजप उमेदवार शिवसेना राष्ट्रवादीतभाजप नेता शिवसेना प्रवेशभाजप विधानसभा उमेदवारराजकीय बातम्याशिवसेना भाजप जागावाटप
Comments (0)
Add Comment