Maa Laxmi Favorite Zodiac Sign : लक्ष्मी नारायण राजयोग! दिवाळीत तुळसह ५ राशींवर देवी लक्ष्मीची अफाट कृपा, सुख- समृद्धीत वाढ

Mata Laxmichhaya Favorite Rashi:दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आहे. या दिवशी माता लक्ष्मी आपल्या आवडत्या राशीच्या लोकांना मालामाल करणार आहे. तुळ आणि धनु या माता लक्ष्मीच्या आवडत्या राशी आहेत पण त्याचबरोबर 5 राशी अशा आहेत, ज्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. यंदा दिवळीत लक्ष्मी नारायण राजयोगाचा अद्भूत योग जुळून आलेला आहे. या शुभ योगात माता लक्ष्मी आपल्या प्रिय राशीची भरभराट करणार आहे. व्यवसायात नफा, उत्तम मिळकत, बँक बॅलन्समध्ये वाढ होणार असून दिवाळीनंतरचांगल्या दिवसांची सुरुवात होईल. नवीन वर्ष भाग्याचं असून सुख समाधान देणारे आहे. माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या त्या 5 राशी कोणत्या ते जाणून घेवूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maa Laxmi Favorite Zodiac Sign : लक्ष्मी नारायण राजयोग! दिवाळीत तुळसह ५ राशींवर देवी लक्ष्मीची अफाट कृपा, सुख- समृद्धीत वाढ

Maa Laxmi Favorite Zodiac Sign: यंदाची दिवाळी खास आहे कारण दिवाळीसोबत लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ आणि धनु यांच्यासह 5 राशीवर माता लक्ष्मीची खास कृपा राहणार आहे. प्रत्येक कार्यात यश तसेच आर्थिक स्थिती उत्तम असेल. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल. चला तर जाणून घेऊया त्या राशी कोणत्या आहेत. माता लक्ष्मी त्या राशींची कशाप्रकारे भरभराट करणार आहे.

वृषभ राशी : दिवाळीत नशिब चमकणार

वृषभ राशीच्या लोकांसाठी यंदाची दिवाळी खास म्हणायला हवी कारण तुमचे नशिब फळफळणार असून, माता लक्ष्मीच्या कृपेने नोकरीत तुमचे महत्त्वाचे स्थान निर्माण होईल. तुमचा करिअर ग्राफ उंचावणार असून नोकरीत तुमचे पद आणि प्रतिष्ठावाढणार आहे. कुटुंबात आनंदाचा वातावरण असून व्यवसायात पैसे कमविण्याच्या अनेक संधी येतील. कुटुंबासोबत आनंद आणि उत्साहाता दिवाळी साजरी करणार आहात.

मिथुन राशी: भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद

मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवाळीत धनसंपत्तीत वाढ होणार आहे. व्यवसायात प्रगती होणार असून तुम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळतील. नवीन वर्षात चांगल्या नोकरीची संधी आहे. तुमचे पैसे कुठे रखडलेले असतील तर ते मिळतील. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने बँक बॅलेन्स वाढेल.

तुळ राशी : उत्पन्नात दुपटीने वाढ

तुळ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप आनंदाची आणि भरभराटीची आहे. उत्पन्नात झपाट्याने वाढ होणार असून करियरमध्ये प्रगतीचे योग आहेत. माता लक्ष्मीच्या आशिर्वादाने कुटुंबात आनंद आणि उत्साहाचे वातावरण राहील. व्यवसायात प्रगती असून व्यापाऱ्यांना मोठ्या डील्स मिळू शकतात. तुमचे रखडलेले पैसे मिळणार आहेत. नवीन वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे आणि सुखसमाधानाचे आहे.

धनु राशी: करियरमध्ये उत्तम यश

धनु राशीच्या लोकांना दिवाळीत आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होणार असून करियरमध्ये उत्तम यश आहे. तुम्ही यशोशिखरावर पोहोचणार आहात. तुमचे रखडलेले पैसे मिळणार असून व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. नवीन वर्षात उत्तम नोकरीची संधी असून वैवाहिक जीवनातील मतभेद देखील दूर होतील. तुमच्या जीवनात आनंद आणि भरभराट होणार आहे.

कुंभ राशी: पद आणि प्रतिष्ठेत वाढ

कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळी भरभराटीची असून शनिच्या शुभ योगामुळे नशिबाची साथ प्रत्येक कामात मिळेल. माता लक्ष्मी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असून आर्थिक भरभराट होणार आहे. व्यवसायात पुढे जाण्याच्या संधी असून नवीन वर्षात तुमची उत्तम प्रगती होणार आहे. नोकरीत पद आणि प्रतिष्ठा वाढणार असून जीवनात यश मिळविण्याचे अनेक योग येतील.

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

diwali 2024Laxmi Pujan 2024Maa Laxmi Favorite Zodiac SignMata Laxmichhaya Favorite Rashiमाता लक्ष्मीच्या आवडत्या राशीया राशींचे नशिब चमकणारलक्ष्मी नारायण राजयोग
Comments (0)
Add Comment