Devendra Fadnavis On Sada Sarvankar Candidacy: माहीम मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदेसेना अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. कारण, शिंदेंचे नेते सदा सरवणकर यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे फडणवीस आता यातून काय मार्ग काढतात हे पाहावं लागणार आहे.
हायलाइट्स:
- माहीमचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही
- फडणवीसांकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न
- सरवणकर माघार घेणार की नाही?
माहीमचा पेच काय?
विधानसभा निवडणुकीसाठी अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या मतदारसंघातून शिंदेंनी उमेदवार जाहीर केला. या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले शिंदेंचे शिलेदार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमित ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सदा सरवणकर यांना उमेदवार अर्ज न भरण्यासाठी समजवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. भाजपने अमित ठाकरेंना पाठिंबा दर्शवला. तर, सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनीही स्वत: त्यांची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी माघार घेणार नसल्याचं सांगितलं.
त्यानंतर अखेर सरवणकरांनी उमेदवारी अर्ज भरला. तसेच, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरेंनी पाठिंबा द्यावा अशी विनंतीही केली. त्यामुळे आता महायुतीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
Devendra Fadnavis: माहीमचा प्रश्न कसा सुटणार, चार दिवसात चमत्कार होणार? देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं
लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार न देत भाजपला त्याची परतफेड करायची आहे. पण, सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आता फडणवीस हे कोडं कसं सोडवतात हे पाहावं लागणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडे फक्त ४ दिवस आहेत. कारण, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख ही ४ नोव्हेंबर आहे.