एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्याचे राज्यपालांकडून कौतुक – महासंवाद




मुंबई, दि. ३१: अवघ्या सोळाव्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयनचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज अभिनंदन केले.

काम्याने बुधवारी (दि. 30) आपले वडील कमांडर एस कार्तिकेयन व आई लावण्या यांच्यासह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना आपल्या एव्हरेस्ट व इतर शिखर गिर्यारोहण अनुभवाची माहिती दिली.

मे महिन्यात काम्याने नेपाळमधून माऊंट एव्हरेस्ट सर करुन भारतातील सर्वात तरुण आणि जगातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला, असल्याचे तिच्या वडिलांनी यावेळी सांगितले.

मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन शाळेची बारावीची विद्यार्थिनी असलेल्या  काम्याने मिशन “साहस” अंतर्गत प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखरावर चढाई करण्याचा तसेच दोन्ही ध्रुवांवर स्की करण्याचा संकल्प केल्याचे तिने सांगितले.

०००







Source link

Comments (0)
Add Comment