इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना मंत्रालयात अभिवादन – महासंवाद




मुंबई, दि. ३१: माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी तसेच माजी केंद्रीय मंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त मंत्रालयात आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्यासह मंत्रालयातील व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवसानिमित्त मुख्य सचिवांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं







Source link

Comments (0)
Add Comment