Today Panchang 1 November 2024 in Marathi: शुक्रवार १ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १० कार्तिक शके १९४६, आश्विन अमावास्या सायं. ६-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: स्वाती उत्तररात्री ३-३० पर्यंत, चंद्रराशी: तूळ, सूर्यनक्षत्र: स्वाती
अमावस्या तिथी सांयकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ, स्वाती नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग सकाळी १० वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर आयुष्यमान योग प्रारंभ, नाग करण सायंकाळी ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र तुळ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४०
- सूर्यास्त: सायं. ६-०४
- चंद्रोदय: सकाळी ६-१९
- चंद्रास्त: सायं. ५-५३
- पूर्ण भरती: सकाळी ११-३२ पाण्याची उंची ३.८५ मीटर, रात्री १२-१२ पाण्याची उंची ४.३६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३२ पाण्याची उंची १.६८ मीटर, सायं. ५-३३ पाण्याची उंची ०.५९ मीटर
- सण आणि व्रत : दीपावली, दर्श अमावास्या, अलक्ष्मी निस्सारण, कौमुदि महोत्सव संपन्न
- लक्ष्मी- कुबेर पूजन मुहूर्त : सायं. ६ वाजून ४ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५० मिनिटांपासून ते ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५५ मिनिटांपासून ते २ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३६ मिनिटांपासून ते ६ वाजून २ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५६ मिनिटांपासून ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४६ मिनिटांपासून ते ९ वाजून ३० मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
पितरांच्या नावाने दिवा लावा आणि काळे तीळ घालून जल अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)