भाजप बंडखोराच्या कारवर हल्ला, कारवर बांबू मारला,आरोपी कोण? धक्कादायक माहिती समोर

Sawantwadi Vishal Parab Attack On Car : सावंतवाडीतील अपक्ष उमेदवार विशाल कदम यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. ड्रायव्हरच्या शिताफीमुळे थोडक्यात त्यांचा जीव वाचला. त्यानंतर पाठलाग करून स्थानिक लोकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : मळेवाड येथील नरकासुर स्पर्धा आटोपून सावंतवाडीत घरी परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करण्यात आला. बांबूने हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्याने विशाल परब यांचा जीव वाचला आहे.

हल्ला करणारा आरोपी झारखंडचा

हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोराने वाऱ्याच्या वेगाने धावत जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या स्थानिक तरुणांनी पाठलाग करून हल्लेखोराला बाजूच्या झाडीतून ताब्यात घेतलं. संतप्त तरुणांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपण झारखंडमधील असल्याचं हिंदीतून बोलत कबूल केलं आहे.
Ahmednagar News : संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला, महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; कारण काय?
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असणारे विशाल परब यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपल्या जीवावर कोणीतरी उठले असल्याचे वक्तव्य विशाल परब यांनी वारंवार यापूर्वी अनेकदा केले आहे. परंतु त्याची गांभीर्याने दखल पोलिसांनी घेतली नाही. तर हा हल्ला करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गच्या राजकारणाला शोभणारा प्रकार नाही, पोलिसांनी याचा योग्य तपास करावा अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर विशाल परब यांनी दिली आहे.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा

निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही

कोणी कितीही दहशत माजवली, तरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही, असेही विशाल परब यांनी म्हटले आहे. या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर विशाल परब यांच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गर्दी केली होती. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरा देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.

Sindhudurg News : भाजप बंडखोराच्या कारवर हल्ला, कारवर बांबू मारला,आरोपी कोण? धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उबाठा गटाचे राजन तेली आणि महायुतीच्या दीपक केसरकर यांच्यात लढत आहे. त्यांच्यासोबतच महाविकास आघाडीतील अर्चना घारे परब आणि महायुतीतील विशाल परब या दोघांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे सावंतवाडीमध्ये बहुरंगी चुरस पाहायला मिळणार आहे.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Sawantwadisawantwadi indipendent candidate vishal parabsawantwadi newssawantwadi vishal parab attack on carsindhudurg newsविशाल परब यांच्या कारवर हल्लासावंतवाडी अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परबसावंतवाडी विधानसभा अपक्ष उमेदवार विशाल परबसिंधुदुर्ग बातमी
Comments (0)
Add Comment