मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा निवडणूक कामकाजाचा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला आढावा – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी आज मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) सत्यप्रकाश टी. एल., हिमांशू गुप्ता, समीर वर्मा, अंजना एम., शिल्पा शिंदे, केंद्रीय निवडणूक पोलिस निरीक्षक पोनुगुंतला रामजी आणि केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांनी विधानसभा कामकाजासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजासंबंधी माहिती जाणून घेतली.

बैठकीत मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्या विभागाशी संबंधित निवडणुकीच्या कामकाजविषयक केलेल्या नियोजनाबाबत माहिती दिली. यावेळी विधानसभा मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी जोशी, मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, मुंबई दक्षिण विभागाचे अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, आणि मध्य मुंबईचे अपर पोलिस आयुक्त अनिल पारसकर, समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजन, समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवार, प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसे समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, समन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटे, समन्वय अधिकारी (स्वीप) विजय सूर्यवंशी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती जोशी यांनी मतदान केंद्रांवर सुरळीत आणि वेळेत मतदान होण्यासाठी केलेल्या पूर्व नियोजनाबद्दल, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्याचे, फ्लाईंग स्कॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती दिली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितले की, “भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व समन्वय अधिकारी कार्यवाही करत आहेत. मतदारांच्या सोयीसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सर्व सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यात स्वीप अभियानांतर्गत मतदार जनजागृतीवर भर दिला जात आहे. शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्प पत्र आणि फ्लॅश मॉब यासारख्या विविध माध्यमांतून प्रभावीपणे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. एसएसटी, एफएसटी पथके कार्यान्वित केली आहेत. सी-व्हिजिल ॲपवर आलेल्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. सर्व विधानसभा क्षेत्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.”

पोलिस प्रशासनाने मुंबई शहर जिल्ह्यात मतदान निष्पक्ष, शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य समन्वय असल्याची माहिती दिली.

यावेळी नोडल अधिकारी (स्वीप) यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर निवडणूक खर्च समिती, प्रसारमाध्यम कक्ष, आचारसंहिता कक्ष, भरारी पथक, परिवहन व्यवस्थापन, पोस्टल बॅलेट तसेच इतर नोडल अधिकाऱ्यांनी निवडणूक पूर्वतयारीसंदर्भात सादरीकरण केले.

००००

शैलजा पाटील/विसंअ

Source link

Comments (0)
Add Comment