राज ठाकरेंनी आयुष्यात फक्त एकदा निवडणूक लढवली; ना काँग्रेस, ना भाजप, मग कोण होता प्रतिस्पर्धी; निकाल काय लागला?

Raj Thackeray: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज ठाकरे यांच्या कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते पहिलेच व्यक्ती आहेत. पण स्वत: राज ठाकरे यांनी एकदा निवडणूक लढवली होती. त्याबद्दल स्वत: राज यांनी एका मुलाखतीत सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. अमित ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवत आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी आदित्य आणि अमित हे दोन्ही ठाकरे निवडणूक लढवत आहेत. ठाकरे कुटुंबात बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव किंवा राज ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. हे जरी सत्य असले तरी राज ठाकरे यांनी आयुष्यात फक्त एकदा निवडणूक लढवली होती. हे स्वत:राज यांनी एका मुलाखतीत सांगितले.

राज ठाकरे हे प्रसिद्ध लेखक, जाहिरातकार कुणाल विजयकर यांच्या ‘खाने मे क्या है’ या शोमध्ये आले होते. यात शोमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील लढलेल्या एकमेव निवडणुकीबद्दल सांगितले. या शोसाठी फक्त राज ठाकरे नाही तर पत्नी शर्मिला आणि अमित ठाकरे तसेच मनसेचे नेते नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार आणि अन्य पदाधिकारी देखील सोबत होते. अमित ठाकरेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार; ठाकरे गटाकडून आयोगाला पत्र लिहून कारवाईची केली मागणी
राज ठाकरे आणि कुणाल विजयकर हे जे.जे.आर्ट्सपासून एकत्र होते. राज ठाकरे यांनी मुलाखतीच्या सुरुवातीला जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात मी कधी निवडणूक लढवली नाही. फक्त एकदाच लढवली होती, कॉलेजमध्ये असताना. क्लास रिप्रेजेंटेटिव(CR)ची ती निवडणूक होती. आमचे दोन वर्ग असायचे आणि दोन जे उमेदवार एकमेकांसमोर होते ते म्हणजे मी आणि कुणाल.
शरद पवारांमुळे गेल्या ५ वर्षात महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झाला; राज ठाकरेंची टीका, मोदी-शहांसह उद्धव ठाकरेंवर बरसले
राज यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर कुणाल म्हणाले, राज यांनी जी एकमेव निवडणूक लढवली ती काँग्रेसविरुद्ध नाही, भाजपच्या विरुद्ध नाही तर ती माझ्याविरुद्ध होती. आणि या निवडणुकीत राज ठाकरे विजयी झाले होते.

कॉलेजमधील निवडणुकीबद्दल बोलताना राज ठाकरेंनी पुढे सांगितले की,आमच्याकडे कोणीही जिंकू दे, कोणीही हरू देत. त्यानंतरची पार्टी कॉमन असायची. त्यामुळे त्या जिंकण्याला काही अर्थ नव्हता.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Kunal Vijaykarmaharashtra election 2024raj thackeray contested electionअमित ठाकरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकराज ठाकरेराज ठाकरे आणि कुणाल विजयकरराज ठाकरेंनी लढवलेली एकमेव निवडणूक
Comments (0)
Add Comment