Sudhakar Sonawane: घरातून निवडणूक प्रचाराला निघताना छातीत दुखू लागलं, उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला हार्ट अटॅक

Sudhakar Sonawane Heart Attack: उद्धव ठाकरे यांच्या चोपडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराला हार्ट अटॅक आल्याची माहिती आहे. सकाळी प्रचारासाठी निघत असताना त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

निलेश पाटील, जळगाव: चोपडा विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर एन्जिओप्लास्टि करण्यात आली असल्याची माहिती आहे. सोनवणे यांचा मुलगा दिनेश सोनवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असून त्यात पक्षाच्या उमेदवारांना पायला भिंगरी बांधून मतदारांपर्यंत जोगवा मागावा लागत आहे. यातच चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्याने तथा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

प्रभाकर सोनवणे यांचा मुलगा दिनेश सोनवणे यांनी वडिलांना खाजगी रुग्णालात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासण्या करून त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचं सांगितलं. यावर त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. आता सध्या तरी त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती त्यांचा मुलगा दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.

विधानसभेत मतदारसंघांमध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात आधी शिवसेना ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, राजू तडवी यांचा चोपडा विधानसभेमध्ये अल्प परिचय असल्याने ऐन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेआधी प्रभाकर सोनवणे यांना अधिकृत उमेदवारी ठाकरे गटातर्फे देण्यात आले

२०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रभाकर सोनवणे यांनी बंडखोरी करत भाजप तर्फे पुरस्कृत उमेदवार म्हणून चोपडा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांचा त्या मतदारसंघात परिचय असल्याने त्यांना शिवसेना ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. मात्र, आज सकाळी प्रचाराला जात असताना सकाळी घरीच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तथा छातीत दुखू लागल्याने तात्काळ त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आत्या त्यांची प्रकृती चांगली आहे आणि लवकरच ते प्रचारात सहभागी होतील अशी माहिती त्यांचा मुलगा दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

chopda candidate sudhakar sonawaneshivsena uddhav thackeraysudhakar sonawane heart attackvidhan sabha nivadnuk 2024उद्धव ठाकरे चोपडा उमेदवारठाकरेंच्या उमेदवाराला हार्ट अटॅकविधानसभा निवडणूकसुधाकर सोनवणे हार्ट अटॅक
Comments (0)
Add Comment