Pune Yerwada Firing News: एक दिवसापूर्वी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांनी एका जुन्या वादातून एका अंडा भुर्जी चालकावर गोळीबार झाला. या गोळीबारात अंडा भुर्जी चालक थोडक्यात बचावला.
हायलाइट्स:
पार्किंगच्या वादातून तरुणावर गोळ्या झाडल्या
धक्कादायक घटनेत तरुणाचा मृत्यू
पुण्यातील येरवडा येथील घटना
आदित्या भवार, पुणे : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी होता होत नाहीय. शहरातील डीपी रोडवर झालेल्या गोळीबाराला एक दिवस उलटला नाही तोवर येरवडा परिसरात रात्री उशिरा पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्कर कर्मचाऱ्याने एका तरुणावर गोळीबार केला. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशिरा येरवडा येथील अशोकनगर परिसरात घडली. स्थानिकांनी जखमीला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेला असता, डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषीत केलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. शाहानवाज मुलाणी (वय ३८) असं गोळी लागून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर श्रीकांत पाटील असं त्या आरोपी लष्कर कर्मचारीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाणी आणि पाटील हे येरवडा परिसरात दरम्यान दोघांमध्ये पार्किंगवरून वाद होत असतात. काल अशोकनगर परिसरात देखील टोकाचा वाद झाला. या वादात निवृत्त कर्मचाऱ्याने पिस्तुल काढून शाहानवाज मुलाणी यांच्यावर फायरिंग केली. ज्यामध्ये एक गोळी मुलाणी यांच्या डोक्यात लागली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी श्रीकांत पाटील याला ताब्यात घेतलं आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याच काम सुरू होतं. Ravi Raja : नऊ दिवस दिल्लीत, भेट दहा मिनिटांची, रवी राजांच्या पक्षांतराचं कारण काँग्रेस नेत्याने सांगितलं
दरम्यान, एक दिवसापूर्वी पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिघांनी एका जुन्या वादातून एका अंडा भुर्जी चालकावर गोळीबार झाला. या गोळीबारात अंडा भुर्जी चालक थोडक्यात बचावला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना रात्री ८ ते १०च्या दरम्यान घडली. दरम्यान गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार हा गोळीबार जुन्या वादातून विरोधी टोळीकडून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गोळीबारामुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळी शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील वडगाव धायरी परिसरातील सृष्टी गार्डन हॉटेलसमोरची ही घटना आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा