Supriya Sule Pawar Family Diwali Padwa : बारामतीमध्ये पवार कुटुंबात दिवाळी पाडवा खास साजरा केला जातो. मात्र यंदा दोन गटाचे दोन पाडवे होणार असल्याची माहिती आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
त्याबद्दल सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, आम्ही ते चिन्ह बाजूला काढून टाकावं अशी मागणी केली होती. परंतु तसं काही झालं नाही. तरी देखील फुल ना फुलाची पाकळी आम्हाला मिळाली. त्या चिन्हांमुळे आम्हाला फटका बसला होता. हे आम्ही डेटा वाईज संख्यानिहाय निवडणूक आयोगाला दाखवून दिलं होतं आणि निवडणूक पारदर्शकपणे व्हावी यासाठी आम्ही ती मागणी केली होती. परंतु तसं घडलं नाही. अर्थात आत्ता जो निर्णय आला आहे त्याचं मी स्वागत करते, असे ते म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी राज्यातील लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अर्थात दिवाळीचा पाडवा हा गोविंद बागेत साजरा होतो. आज हजारो लोक गोविंद बागेत येऊन भेटून गेले. उद्या देखील येथील हा एक दिवस असतो ज्याची आम्ही आतुरतेने लोकांची वाट पाहत असतो, वर्षातील हा सगळ्यात महत्त्वाचा, आनंदाचा दिवस असतो असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, अजित पवारांनी स्वतंत्र पाडवा काटेवाडीतील निवासस्थानी आयोजित केल्यासंदर्भात विचारले असता, अजित पवारांनी स्वतंत्र पाडवा आयोजित केला आहे का? याच्याविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Supriya Sule : पक्षासोबतच पवारांच्या पाडव्यातही फूट? पवार कुटुंबासाठी महत्त्वाचा दिवस, सुप्रिया सुळे म्हणाल्या…
मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर अगदी माजकेच लोक शरद पवारांसोबत राहिले. यंदा विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष पाहायला मिळेल. पण त्याआधी या एकाच पवार कुटुंबात दोन पाडवे होणार असल्याची चर्चा आहे.