Finance Horoscope Today 2 November 2024 In Marathi : 2 नोव्हेंबर, आज शनिवार, कार्तिकमासारंभ, दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, अन्नकूट, गोवर्धन पूजा असे अनेक योग एकसाथ जुळून आलेले आहेत. त्याचा शुभप्रभाव प्रत्येक राशीवर जाणवेल. मेष राशीच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात बदल आणि कामात गडबडीची शक्यता आहे. वृषभ राशीला दुपारी चांगली बातमी मिळणार आहे. कर्कसाठी कामांना गती, धनलाभाचा योग असून कन्या राशीच्या लोकांची सरकारी कामे मार्गी लागतील. कुंभ राशीची जास्त धावपळ आणि खर्च जास्त होणार आहे. मीन राशीच्या लोकांची व्यवसायात उत्तम प्रगती आहे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात बदल, कामात गडबडीची शक्यता
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने काही बदल होऊ शकतात, सहकाऱ्यांचे मूड खराब असणार आहेत आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर होवू शकतो. तुम्ही सद्वर्तनाने वातावरण सामान्य करू शकता. पत्नीची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज मित्रपरिवार आणि प्रियजनांची खूप मदत मिळणार आहे.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : दुपारी चांगली बातमी मिळणार
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून कुटुंबासोबत दिवस आनंदात व्यतीत होणार आहे. दुपारी तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सजग राहा. संध्याकाळी पाहुणे येण्याची शक्यता असून वेळ आणि खर्च वाढणार आहे. व्यवसायात नवीन योजना अंमलात आणू शकता त्याचा उत्तम लाभ होईल. आर्थिक स्थिती चांगली आहे पण खर्च वाढणार आहेत.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : अनावश्यक खर्च टाळा
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून, वडिलांचा आशिर्वाद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा यामुळे धनसंपत्ती वाढ होईल. काहीतरी मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. वाहन चालवताना सावध राहा. मित्र परिवार आणि प्रियजनांच्या भेटी तुमचे मनोबल वाढविणार आहेत. घरातील कामे पूर्ण होतील आणि प्रत्येक कामात पत्नीची साथ मिळेल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : कामांना गती, धनलाभाचा योग
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. तिजोरी भरण्याची शक्यता असून तुमच्या कामांना गती मिळेल. व्यावसायिक योजना सफल होणार आहेत तसेच मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घाई आणि भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला पश्चात्ताप देवू शकतात. देवदर्शनचा लाभ होणार आहे.
सिंह आर्थिक राशिभविष्य : मानसन्मान वाढ, स्पर्धेत पुढे जाणार
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अपेक्षित यश देणार आहे. तुम्ही राजकारणात असाल तर तुमचा मानसन्मान वाढेल. स्पर्धेत तुम्ही पुढे असाल तसेच थांबलेली कामे पूर्ण होतील. तुमची पचनक्रिया मंद होवू शकते त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. डोळ्यांचा त्रास असेल तर तज्ज्ञाची मदत घ्या. खाण्यापिण्यावर विशेष लक्ष असू दे. संध्याकाळी प्रियजनांच्या भेटी झाल्यामुळे मन आनंदी होईल.
कन्या आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे मार्गी लागतील
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभ देणार आहे. मंगल कार्याच्या आयोजनाचे नियोजन कराल. रचनात्मक कार्यात मन लागणार असून सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न राहिलं. सरकारी कामे मार्गी लागणार आहेत. घरातील समस्या हळूहळू सुटतील. संध्याकाळी धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात कामे मार्गी लागतील फक्त फोकस हवा.
तुळ आर्थिक राशिभविष्य : शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात यश
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात तुम्हाला विशेष यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येणार आहेत त्याचा लाभ घ्या. तुमच्या बोलण्यामुळे सगळेजण प्रभावीत होतील तसेच विशेष मान मिळण्याची शक्यता आहे. धावपळीमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सावध राहा. जोडीदाराची मदत प्रत्येक कामात मिळणार आहे. प्रवासात लाभ आहे त्यामुळे प्रवास करावा.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : मान सन्मानासह प्रतिष्ठेत वाढ
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून आर्थिक बाबतीत तुमची प्रगती होणार आहे. धन संपत्ती वाढ, मान सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होणार आहे. तुमची थांबलेली कामे पूर्ण होणार असून प्रियजनांच्या भेटी होतील. तुमच्या बोलण्यावर संयम ठेवला नाही तर प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणार आहात.
धनू आर्थिक राशिभविष्य : भरपूर खरेदी करणार आहात
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चाचा आहे. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करणार आहात. सुखसुविधा देणाऱ्या साधनांमध्ये वाढ होईल. तुमच्या ऑफिस सहकाऱ्यांकडून किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांमुळे ताण वाढू शकतो. पैशांचे व्यवहार करताना सावध राहा, धन संपत्ती अडकू शकते. सरकारी कामांसाठी जास्त त्रास होण्याची शक्यता आहे पण यश तुम्हाला मिळेल.
मकर आर्थिक राशिभविष्य : आर्थिक स्थिती मजबूत
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे त्यामुळे गुंतवणुकिचा विचार नक्की करा. व्यवसायात बदल करण्याची योजना आखाल. स्पर्धात्मक परीक्षेत यश असून कौटुंबिक जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडणार आहात. संध्याकाळी धार्मिक ठिकाणी फिरायला जाण्याचा कार्यक्रम रद्द होवू शकतो. वाहन चालवताना सावध राहा कारण वाहन अचानक खराब होण्याची शक्यता आहे.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : जास्त खर्च होणार
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ओके आहे पण अचानक पत्नीची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे जास्त धावपळ आणि खर्च होईल. संपत्ती खरेदी विक्री करत असाल तर सर्व कायदेशीर पैलूवर गंभीरतेने विचार करा. संध्याकाळी पत्नीच्या आरोग्यात सुधारणा होईल, परंतु पूर्णपणे तब्येत सुधारण्यासाठी वेळ लागेल. धावपळीमुळे तुम्हाला ताण येवू शकतो, काळजी घ्या.
मीन आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात उत्तम प्रगती
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून वैवाहिक जीवनात आनंद असेल. आज प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला उत्तम लाभ मिळेल. व्यवसायात उत्तम प्रगती होणार आहे. विद्यार्थ्यांवरचा मानसिक ताण कमी होईल. संध्याकाळी फिरताना काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्यामुळे तुमचे मन हलके होईल. ज्येष्ठांचा आशिर्वाद तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाल यश देईल.