सांगलीमध्ये बंडखोरी रोखण्यात चेन्नीथला अपयशी, जयश्री पाटलांनी नाकारली मोठी ऑफर, लढण्यावर ठाम

महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप झाल्यावर अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी पक्षश्रेष्ठी आपले प्रयत्न करत आहेत. मात्र सांगलीमध्ये लोकसभेनंतर विधानसभेलाही बंडखोरी रोखण्यात काँग्रेसला अपयश आल्याचं दिसत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगली विधानसभेमध्ये काँग्रेस मधून बंडखोरी कायम असून जयश्री पाटील या विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. 5 तारखेला त्या काँग्रेस कमिटी पासून प्रचाराला शुभारंभ करणार आहेत. जयश्री पाटील यांनी बंडखोरी मागे घ्यावी, यासाठी काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्याला काही यश आलं नसल्याचं दिसत आहे कारण पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर ठाम आहेत.

जयश्री पाटील यांना विधान परिषदेची देखील ऑफर देण्यात आली होती. परंतु जयश्री पाटील यांनी विधान परिषदेची ऑफर नाकारली असून त्या विधानसभा निवडणूक लढण्यावर काम आहेत. तसेच खासदार विशाल पाटील देखील माझ्यासोबत असल्याचा निर्वाळा जयश्री पाटील यांनी दिलाय. जयश्री पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पाकीट चिन्ह मागितलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांनी पाकीट चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांनी देखील पाकीट चिन्ह मागितलं आहे.

काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी पृथ्वीराज पाटील यांना जाहीर झाले आहे पृथ्वीराज पाटील यांनी जयश्री पाटील यांची भेट घेत बंडखोरी न करण्याचे विनंती केली होती परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढण्यावर जयश्री पाटील हे ठाम आहेत. पाच तारखेला सांगलीमध्ये प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे यावेळी खासदार विशाल दादा पाटील आणि काँग्रेस पक्षातील सर्व अशी माझी नगरसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा एक विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आपल्यालाच पाठिंबा द्यावा भाजपचा पराभव मी करू शकतो त्यामुळे माझ्यासोबत त्यांनी यावं असेही आव्हान त्यांनी या वेळेस केला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पुन्हा सांगली पॅटर्न पहाव्यास मिळणार आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

jayashree patilSangliSangli vidhan sabhaVidhan Sabha Electionकाँग्रेसजयश्री पाटीलसांगली
Comments (0)
Add Comment