आजचे पंचांग 2 नोव्हेंबर 2024: बलिप्रतिपदा, कार्तिकमासारंभ ! तिथीसह पाहा दीपावली पाडवा औक्षण, वहीपूजन शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 2 November 2024 in Marathi: शनिवार २ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ११ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल प्रतिपदा रात्री ८-२१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा उत्तररात्री ५-५७ पर्यंत, चंद्रराशी: तूळ रात्री ११-२२ पर्यंत, सूर्यनक्षत्र: स्वाती

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक १, विक्रम संवत २०८१, कार्तिक शुद्ध प्रतिपदा शनिवार, सौर कार्तिक मास प्रविष्टे १७, रबी उल्सानी २९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ

विशाखा नक्षत्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, आयुष्यमान योग सकाळी ११ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, किस्तुघ्न करण सकाळी ७ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४१
  • सूर्यास्त: सायं. ६-०४
  • चंद्रोदय: सकाळी ७-१०
  • चंद्रास्त: सायं. ६-३१

  • पूर्ण भरती: दुपारी १२-०० पाण्याची उंची ३.८६ मीटर, रात्री १२-४४ पाण्याची उंची ४.४४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०५ पाण्याची उंची १.६९ मीटर, सायं. ५-५९ पाण्याची उंची ०.४९ मीटर
  • सण आणि व्रत : कार्तिकमासारंभ, दीपावली पाडवा, बलिप्रतिपदा, अनलनाम संवत्सर विक्रम संवत् २०८१ प्रारंभ, श्रीमहावीर जैन संवत् २५५१ प्रारंभ, अन्नकूट, गोवर्धन पूजा
  • वहीपूजन मुहूर्त : पहाटे ४ वाजून १० मिनिटांपासून ते ६ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर सकाळी ८ वाजल्यापासून १० वाजून ५० मिनिटांपर्यंत
  • पतीला औक्षण करण्याचा मुहूर्त : संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५० मिनिटांपासून ते ५ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५५ मिनिटांपासून ते २ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ६ वाजून १ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपासून ते ९ वाजून १९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीनवाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
गायीसाठी चार पोळ्या बाजूला काढून स्वतःच्या हाताने खायला घाला.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

2 november daily panchang2 नोव्हेंबर दिनविशेष2 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगबलिप्रतिपदा
Comments (0)
Add Comment