Raj Thackeray : यावेळी मनसेने १३५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे यावेळी मनसे काय करिष्मा दाखवणार याची उत्सुकता आहे.
पहिल्याच निवडणुकीत मोठं यश
मनसेने २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नात मनसेचे १३ आमदार निवडून आले होते. नाशिकमधून मनसेचे तीन आमदार निवडून आल्याने तो पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. हर्षवर्धन जाधव, शिशिर शिंदे, राम कदम, प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश वांजळे असे मनसेचे मोठे शिलेदार निवडून आले. मात्र यापैकी जाधव, शिंदे, कदम, दरेकर यांनी नंतर पक्षाला रामराम ठोकला. तर वांजळे यांचं निधन झालं.
सलग दोन वेळा एक-एकच आमदार
मनसेला त्या निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. २०१४ च्या विधानसभेला मनसेचा एकच आमदार निवडून आला. जुन्नरमधून शरद सोनवणे आमदार झाले. तर २०१९ च्या निवडणुकीआधीच सोनवणेंनी पक्ष सोडला. २०१९ मध्ये राजू पाटील हे एकमेव मनसे आमदार निवडून आले.
MNS 13 MLAs : बिछडे सभी बारी-बारी, पहिल्याच विधानसभा निवडणुकीत जबराट यश, मनसेचे ‘ते’ १३ आमदार आता कुठेत?
मनसेचे त्यावेळचे १३ आमदार
हर्षवर्धन जाधव – कन्नड (आता अपक्ष)
उत्तमराव ढिकळे – नाशिक पूर्व
वसंत गिते – नाशिक
नितीन भोसले – नाशिक पश्चिम
रमेश रतन पाटील – कल्याण ग्रामीण
प्रकाश भोईर – कल्याण पश्चिम
मंगेश सांगळे – विक्रोळी
शिशिर शिंदे – भांडुप पश्चिम (आता शिवसेनेत)
राम कदम – घाटकोपर पश्चिम (आता भाजपमध्ये)
प्रवीण दरेकर – मागाठणे (आता भाजपमध्ये)
बाळा नांदगावकर – शिवडी
नितीन सरदेसाई – माहीम विधानसभा
रमेश वांजळे – खडकवासला (निधन)