Ashwatthama Rushi Yatra Youth Died: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर अस्तंबा ऋषी पर्वतावर अश्वस्थामा यात्रा भरते. या यात्रेसाठी गेलेल्या एक तरुण पाय घसरुन दरीत पडला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील सर्वात उंच शिखरावर अश्वस्थामा यांची यात्रा भरते. या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यातील हजारो भाविक दाखल होत असतात. धनत्रयोदशी पासून दोन दिवस ही यात्रा भरते. शहादा येथील साईबाबा नगर येथे राहणाऱ्या निखिल शंकर वाडीले (वय २४) हा तरुण २७ ऑक्टोबर रोजी त्याच्या मित्रांसोबत अंस्तबा येथे शिखरावर असलेल्या अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी गेला होता.
२८ ऑक्टोबर रोजी अस्तंबा ऋषी शिखरावरुन दर्शन करुन परत येत असताना उतारवरून निखिलचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. निखिल वाडीले घरी न पोहोचल्याने त्याच्या भावाने त्याचा शोध घेतला. मात्र, तो कुठेही मिळून आला नाही. त्यामुळे त्याच्या भावाने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांना अस्तंबा गाव शिवारातील अस्तंबा ऋषी शिखराखालील खोल दरीत शोध घेतला असता त्या ठिकाणी निखिलचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी निखिलचा भाऊ आकाश शंकर वाडीले यांच्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवलदार किरण अर्जुन वळवी करीत आहेत.
Nandurbar News: यात्रेवरुन परतताना शिखरावरुन पाय घसरला अन् खोल दरीत पडला, तरुणाचा हादरवणारा अंत
सातपुड्यातील सर्वोच्च शिखरावर अश्वस्थामा यात्रेला सुरुवात
सातपुड्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या अश्वस्थामा ऋषी यात्रेत्सवाला सुरुवात झाली असून डोक्यावर कळस घेऊन आणि विविध प्रकारच्या वेशभूषा साकारत ढोल ताशाचा गजरात वाजत गाजत आदिवासी बांधव अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी जात असतात. आपल्या शेतात पिकवलेलं नवं धान्य अस्तंबा ऋषीला नैवेद्य दाखवल्यानंतर धान्य कापणीला आदिवासी बांधव सुरुवात करत असतात या यात्रे उत्सवाला नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील हजारो तरुण पदयात्रा अस्तंबा ऋषींच्या दर्शनासाठी शिखरावर रवाना होत आहेत.