दिवाळीच्या पर्वावर नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणासोबत आक्रीत घडलं; सणवाराला कुटुंब दु:खाच्या छायेत

Gadchiroli News: दिवाळीच्या दिवशी लगतच्या नदीत अंघोळीसाठी गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. महाराष्ट्र-तेलंगणा या दोन राज्यांच्या मधोमध वाहणाऱ्या प्राणहिता नदीपात्रात ही घटना घडली.

Lipi

गडचिरोली : दिवाळीच्या दिवशी लगतच्या नदीत अंघोळीसाठी गेलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना शुक्रवार सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. महाराष्ट्र-तेलंगणा या दोन राज्यांच्या मधोमध वाहणाऱ्या प्राणहिता नदीपात्रात ही घटना घडली. तेजस राजू बोम्मावार असे तरुणाचे नाव असून तो अहेरीतील वांगेपल्ली गावचा रहिवासी आहे.

सविस्तर वृत्त असे की, राजू बालय्या बोम्मावार यांचा अहेरीलगतच्या वांगेपल्ली येथे हार्डवेअरचं दुकान आहे. त्यांना दोन मुलं असून मोठा मुलगा पुणे येथे एमबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. दिवाळीनिमित्त दोन दिवसांपूर्वी तो आपल्या घरी सुट्ट्यांसाठी आला. शुक्रवारी तो लगतच्या प्राणहिता नदीपत्रात आपल्या काही मित्र आणि नातेवाईकांसोबत अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरीकरांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. तर अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार हे देखील आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि महसूल प्रशासनातर्फे बोटीच्या साहाय्याने जवळपास सकाळी ९.३० पासून शोधमोहीम राबविण्यात येत असून अजूनपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही.
Pune Crime : भररस्त्यात ‘घोडा’ काढला आणि बाईकस्वाराला दाखवला, बंदूक पाहून सगळेच हादरले, Video व्हायरल
तेजस बोम्मावार हा पुणे येथे एमबीए अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. अंघोळीसाठी नदीपात्रात वाहून गेल्याने ऐन दिवाळीच्या दिवशी बोम्मावार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, बाबा आणि लहान भाऊ आहे. अहेरी येथील तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि नगरपंचायतच्या बोटीद्वारे शोधमोहीम राबविण्यात आहे.

प्राणहिता नदीची पाण्याची पातळी वाढली

अहेरीलगत असलेल्या वांगेपल्ली येथे प्राणहिता नदी वाहते. महाराष्ट्र आणि तेलंगाणा या दोन राज्यांमध्ये ही नदी दुभागते. नदीपलीकडे तेलंगणा राज्यातील कुमरमभीम जिल्हा असून या भागातील नागरिकांचा तेलंगाणा राज्यातील नागरिकांशी रोटीबेटीचा व्यवहार आहे. तर प्रत्येक सणाला अहेरीकर या नदीपात्रात स्नान करतात. दिवाळी निमित्ताने बरेच लोक अंघोळीसाठी प्राणहिता नदीपात्रात डुबकी घेत असतात. अशातच ही दुःखद घटना घडली आहे. विशेष म्हणजे प्राणहिता नदीत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असून पाण्याचा प्रवाह वाढताच आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

gadchiroli newsmaharashtra breaking newssad news in diwali festivalYouth swept away in riverअहेरीतील तरुणावर काळाचा घालागडचिरोली ब्रेकिंग बातम्यादिवाळीच्या पर्वावर दु:खद बातमीमहाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
Comments (0)
Add Comment