Trupti Sawant meets Zeeshan Siddique : “ह्याला म्हणतात हिट विकेट.. मॅडम, भाई आणि सहकारी निवडणूक चर्चा” असं कॅप्शन देत मनसे उमेदवार तृप्ती सावंत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांच्या भेटीचा फोटो अखिल चित्रे यांनी शेअर केला आहे.
“ह्याला म्हणतात हिट विकेट.. मॅडम, भाई आणि सहकारी निवडणूक चर्चा” असं कॅप्शन देत मनसे उमेदवार तृप्ती सावंत आणि राष्ट्रवादीचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांच्या भेटीचा फोटो अखिल चित्रे यांनी शेअर केला आहे.
अखिल चित्रे यांचा आरोप काय?
“ज्यांना उमेदवारी दिली गेली आहे त्या मनसेतनं जिंकण्यासाठी नाही तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी उभे राहत आहेत.” असा आरोप अखिल चित्रे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. “सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी वेळ साधारणता रात्री ९:३० – १०:३० दरम्यान ठिकाण मकबा हाईट्स येथे मीटिंग झाली. तिथे झिशान सिद्दीकी यांच्याबरोबर सौदा करून फक्त आणि फक्त त्यांच्या सांगण्यावरून त्या मनसेतून निवडणूक लढण्यासाठी तयार झाल्यात, असा आरोप अखिल चित्रे यांनी केला होता. त्याचा फोटो आता त्यांनी शेअर केला आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघात २०१९ मध्ये तृप्ती सावंत यांना शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे त्या अपक्ष रिंगणात उतरल्या होत्या. मतविभाजनाचा फटका बसल्याने शिवसेना उमेदवार आणि दिवंगत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला. तर काटाकाटीत काँग्रेसच्या तिकिटावर उतरलेले झिशान सिद्दीकी पहिल्याच प्रयत्नात विजयी झाले होते.
यंदाही तशीच परिस्थिती असून आता सावंत यांना मनसेचं पाठबळ मिळालं आहे. त्यामुळे सेनेची मतं विभागली जाऊन सिद्दीकींना फायदा होण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर असलेली सहानुभूती, विद्यमान आमदार असल्याने मिळणारं पाठबळ आणि मतदारसंघातील ३३ टक्के मुस्लिम समाजाची मतं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरु शकतात. याकडेच चित्रेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
माझ्या राजसाहेबांना फसवले जात आहे मला माहिती आहे आणि गप्प बसणं ह्याला जर काही कमेंट करणारी लोकं राज निष्ठा समजत असतील तर माफी आसावी मी असा राज निष्ठ नाही, असंही अखिल चित्रेंनी याआधी म्हटलं होतं.