विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांसाठी आनंदाची बातमी, चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा

विधानसभा निवडणुकीपूर्वी, शरद पवार यांच्या गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणूक आयोगाने त्यांच्या ‘तुतारी’ या चिन्हाचा मराठी अनुवाद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवारांना लोकसभेला बसलेला मतांटा आता टळला जाणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी लक्षात आलेली चुक आता पवार गटाने सुधारली असून त्याचा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच पवारांना फायदा होणार आहे. निवडणुक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचे तुतारी हे भाषांतर गुरूवारी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने पवारांच्या राष्ट्रावादीला दिलासा मिळालाय.

नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडल्यावर शरद पवार गटाने लोकसभा निवडणुक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हावर लढवली होती. ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे मराठी भाषांतर तुतारी असे करण्यात आले होते. मात्र अनेक मतदारसंघात काही उमेदवारांनी तुतारी आपले चिन्ह ठेवल्याने पवार गटाच्या उमेदवारांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला होता. शरद पवार गटाने हा झालेला गोंधळ टाळण्यासाठी त्यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी केल्याने फटका बसल्याचा दावा केला होता. त्यानंतर याव निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असून हे शरद पवार गटाच्या ‘ट्रम्पेट’ चिन्हाचे तुतारी मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतल गेला आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या चिन्हाचे नाव तुतारी वाजवणारा माणूस हे नाव कायम असणार आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये या ट्रम्पेट चिन्हाचा वापरू करून उमेदवारांनी हजारो मते घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आता वेळीच सावध होत लोकसभेला मतांचा बसलेला फटका आता बसू नये यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधीपासूनच दक्षता घेतली. निवडणूक आयोगानेही शरद पवार गटाची मागणी मान्य केल्याने मतदारांमध्ये होणारा गोंधळ टाळला जाणार आहे. राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना नवीन आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी फायद्याचा ठरणार आहे.

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बड्या उमेदवारांच्या नावाच्या अपक्ष उमेदवारांनी अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम होण्याची शक्यता आहे. यासाठी मोठे उमेदवार पुढे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

Sharad PawartrumpetTutarividhansabha election 2019ट्रम्पेटतुतारीविधानसभा निवडणूक २०२४शरद पवार
Comments (0)
Add Comment