शेतीतून लाखोंचे उत्पन्न, पाच वर्षांत उत्पन्नात तिप्पट वाढ, आमदार प्रशांत ठाकूरांची संपत्ती किती?

MLA Prashant Thakur Wealth: पनवेल विधानसभेचे मागील पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे प्रशांत ठाकूर श्रीमंतीत मागे पडलेले नाही. राज्यातील काही मोजक्या श्रीमंत आमदारांच्या यादीत त्यांचे स्थान अबाधित आहे. यंदा तर त्यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
prashant thakur1

म. टा. वृत्तसेवा, पनवेल : २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आमदार प्रशांत ठाकूर यांची मालमत्ता पाच वर्षांत तिपटीने वाढली आहे. तब्बल १४६ कोटींचे मालक असलेल्या आमदारांना शेती, आमदारकीचे मानधन, व्याज, जागेचे आणि घरांचे भाडे आणि शेअर्समधील गुंतवणूक यामधून उत्पन्न मिळते. पाच वर्षांपुर्वी ५५ कोटी रूपयांची मालमत्ता आता तब्बल १४६ कोटी इतकी झाली आहे.

पनवेल विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आपल्या आर्थिक उत्पन्नाच्या साधनांची माहिती भरणे बंधनकारक असते. आपल्या मतदार संघाचा विकास करताना लोकप्रतिनिधी स्वताचा आणि कुटुंबीयांच्या विकासासाठी वेळ कसा देतात असा प्रश्न पडावा इतके संपत्तीचे आकडे मोठे असल्याचे समोर आले आहे. पनवेल विधानसभेचे मागील पंधरा वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे प्रशांत ठाकूर श्रीमंतीत मागे पडलेले नाही. राज्यातील काही मोजक्या श्रीमंत आमदारांच्या यादीत त्यांचे स्थान अबाधित आहे. यंदा तर त्यांच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रशांत ठाकूर आर्थिक प्रगती मात्र मोठी आहे. पाच वर्षांपुर्वी त्यांची मालमत्ता ५५ कोटी होती, यंदा त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता १४६ कोटी इतकी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. २०१९ ला त्यांची जंगम मालमत्ता ३६ कोटी ९६ लाख होती, तर स्थावर मालमत्ता ५५ कोटी ७१ लाख होती.

गतवर्षी त्यांच्या मालमत्तेत वाढ झाल्याचे म्हणणे असले तरी उत्पन्नात मात्र घट झाल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. विशेष म्हणजे कोट्यधीश असलेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांना आमदारकीचे मानधन, शेती, जागेचे आणि घरांचे भाडे, ठेवींवरील व्याज, शेअरमार्केटमधील गुंतवणूक आदींमधून उत्पन्न मिळते. शेतीतून उत्पन्न मिळत असल्यामुळे प्रशांत ठाकूर शेतकरी असल्याचेही यातून दिसते आहे. याशिवाय त्यांच्या पत्नींचे उत्पन्न चालू वर्षांत सुमारे ६१ लाख इतके असून त्यांचाही शेती व्यवसाय आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात तिसरी निवडणूक लढविण्यासाठी मैदानात उतरलेले शेकाप नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांची संपत्ती मात्र प्रशांत ठाकूर यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
काँग्रेसचे दोनच मराठी उमेदवार; मुंबईत ११ जागांमध्ये टक्का कमीच, फटका बसण्याची शक्यता
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार २०२३ -२४ या आर्थिक वर्षांत त्यांचे उत्पन्न अवघे २ लाख ७० हजार रूपये इतके आहे. जंगम मालमत्ता ९२ लाख ७० हजार इतकी आहे, तर स्वताच्या मालकीची मालमत्ता ६ कोटी ७८ लाख इतकी आहे. वारशातून मिळालेली मालमत्ता १२ कोटी ६३ लाख इतकी आहे.
दोन दिवस बेस्ट कोलमडणार? कर्मचाऱ्यांकडून दिवाळी रजा घेऊन आगार बंद करण्याचा प्रयत्न
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या तिसऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवार माजी नगरसेविका लिना गरड पदवीधर असून त्या बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांनाही जागेच्या भाड्यातूनही उत्पन्न मिळते. चालू आर्थिक वर्षांत त्यांना १३ लाख ४० हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जंगम मालमत्ता १ कोटी २३२ लाख, स्थावर मालमत्ता ५ कोटी २ लाख इतकी आहे.

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

maharashtra assembly elections 2024maharashtra electionspanvel mla prashant thakurpanvel vidhan sabhaprashant thakur wealthपनवेल बातम्या
Comments (0)
Add Comment