Monthly Horoscope November 2024 in marathi : नोव्हेंबर महिन्यात शनिचे मार्गक्रमण होणार आहे. तसेच कुंभ राशी देखील परिवर्तन होणार त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक, व्यवसाय आणि नातेसंबंधातील अनेक गोष्टी सुधारणार आहे. तुमची राशी काय सांगते त्यासाठी सविस्तरपणे वाचा राशिभविष्य.
नोव्हेंबर महिन्यात शनिचे मार्गक्रमण होणार आहे. तसेच कुंभ राशी देखील परिवर्तन होणार त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. ग्रहांच्या संक्रमणामुळे आर्थिक, व्यवसाय आणि नातेसंबंधातील अनेक गोष्टी सुधारणार आहे. ग्रहांच्या या बदलामुळे नोव्हेंबर महिना कर्क, तुळसह या 5 राशींसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचे राशीभविष्य सविस्तर जाणून घेऊया.
मेष – बोलण्यावर नियंत्रण ठेवा
मेष राशीसाठी नोव्हेंबरचा महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला अचानक आयुष्यात काही आव्हानांना सामोरे जावे लागेल. या काळात रागावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. इतरांच्या मदतीने तुमची अर्पूण कामे पूर्ण होतील. नवीन काम सुरु करण्याचा प्रयत्न करत असाल तर प्रकल्पात अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. तुमच्या जीवनात वेळ आणि पैशाची कमतरता भासेल. चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवणे टाळा. तुमचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी विचार करावा लागेल. प्रेमी जोडीदारासोबत गैरसमज निर्माण होतील. मानसिक तणाव राहिल. वैवाहिक जीवन सुखी ठेवण्यासाठी सासरच्या भावनांचा आदर करा.
वृषभ – आर्थिक बजेट बिघडेल
हा महिन्या तुमच्यासाठी अचानक मोठे खर्च वाढवणारा असेल, ज्यामुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडेल. या काळात तुम्ही मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत असाल. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करावा लागेल. प्रवास थकवणारा असेल. अपेक्षेपेक्षा कमी फायदा मिळेल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या किंवा करिअर करणाऱ्यांना हा महिना लाभदायक ठरेल. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. कोणत्याही प्रकारची समस्या टाळण्यासाठी आपले कागदपत्रे पूर्ण ठेवा. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तुम्हाला मोठ्या कामात विशेष यश मिळेल. यशाच्या उत्साहात प्रियजनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. प्रेमसंबंधांच्या बाबतीत भावनांमध्ये वाहून जाऊ नका. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होईल. लव्ह पार्टनरसोबत चेष्टा करताना काळजी घ्या, नात्यावर परिणाम होईल. प्रेमाच्या नात्याचे रुपांतर लग्नात होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
मिथुन – अडथळ्यांचा सामना करावा लागेल
मिथुन राशीच्या लोकांनी कामात निष्काळजीपणा दाखवू नये, अन्यथा काम बिघडू शकते. तुम्हाला हुशारीने पैसे खर्च करावे लागतील, आर्थिक बजेट बिघडू शकते. या काळात कोणलाही वचन देऊ नका, भविष्यात पूर्ण करताना अडचणी येतील. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. तुमची कोणतीही योजना लोकांसमोर येईल. विरोधकांमुळे अडथळा सहन करावा लागेल. कुटुंबातील व्यक्तीबद्दल काळजी वाटेल. कौटुंबिक समस्या सोडविण्यात कुणाचेही सहकार्य मिळणार नाही. वाहन चालवताना काळजीपूर्वक चालवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. या काळात जवळच्या मित्रांकडून सहकार्य मिळेल. घरगुती कामासाठी अधिक धावपळ करावी लागू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना अडकलेले पैसे काढताना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. प्रेमसंबंध सामान्य राहिल. जोडीदाराशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
कर्क – व्यवसायात प्रगती होईल
नोव्हेंबर महिना या राशीच्या लोकांसाठी चांगले भाग्य घेऊन येणार आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त राहिल. गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. करिअर व्यवसायात लांबचा प्रवास शक्य आहे. प्रवास सुखकर होईल, अपेक्षित यश मिळेल. प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्यामुळे फायदा होईल. राजकारणातील लोकांना मोठे यश मिळले. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील. महिन्याच्या मध्यात चांगली बातमी मिळेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार आहे. परदेशात करिअर आणि व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरदारांसाठी हा महिना शुभ राहिल. नोकरीच्या ठिकाणी तुमचा मान-सन्मान वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण झाल्याने अपेक्षित लाभ होईल. प्रेमसंबंधात हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल.
सिंह – नियोजित कामे वेळेवर पूर्ण
नोव्हेंबरचा महिना तुमच्यासाठी अधिक शुभ आणि यशस्वी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास आनंददायी ठरतील. त्यातून तुम्हाला इच्छित यश मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण झाल्यास तुमचा उत्साह वाढेल. या काळात कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटाल ज्यामुळे भविष्यात आर्थिल लाभ होईल. नोकरदार महिलांना या काळात मोठे यश मिळेल. समाजात आणि घरात तुमचा सन्मान वाढेल. जोडीदार कामात मदत करेल. नवीन वाहन खरेदी केल्याने आनंदी असाल. जमीन- मालमत्ता संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्याल. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होईल. नातेसंबंध आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
कन्या – सामाजिक कार्यात सहभागी व्हाल
हा महिना तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. नोकरदार लोकांवर कामाचा ताण जास्त वाढेल. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. वैयक्तिक आयुष्यात काही समस्या चिंतेचे कारण बनतील. या काळात कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. धार्मिक तीर्थस्थळी जाल. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक चिंता वाढेल. हितचिंतकाच्या मदतीने समस्येवर मात कराल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्याने योजना प्रत्यक्षात येतील. आरोग्याची काळजी घ्या. प्रेमाच्या बाबतीत हा महिना शुभ राहिल. प्रेमी जोडीदारसोबत विश्वास वाढेल.
तुळ – बजेट बिघडेल
नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला वेळ आणि पैसा दोन्ही हुशारीने खर्च करावा लागणार आहे. या काळात अचानक मोठ्या खर्चांमुळे तुमचे बजेट बिघडेल. नोकरदारांनी आपले काम इतरांना देणे टाळा, अन्यथा बॉसचा रोषाला सामोरे जावे लागेल. नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास दु:खी व्हाल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर गोष्टी स्पष्ट करुन पुढे जाल. आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही आजारांमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहाल. नोकरदारांना मोठी जबाबदारी मिळेल. खराब झालेले काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांसोबत काम करावे लागेल. करिअर व्यवसायात प्रयत्न करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. आर्थिक समस्या उद्भवतील. या महिन्यात प्रेम जीवनात अडथळे येतील. प्रेमसंबंधांमध्ये विचारपूर्वक पुढे जा. आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. कोणताही गैरसमज वादाऐवजी संवादातून सोडवा. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे प्रमुख कारण असेल.
वृश्चिक – आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका
या महिन्यात तुम्हाला आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात चढ- उतारांना सामोरे जावे लागेल. पैसे खर्च केले तर तुमचे बजेट बिघडू शकते. तुमच्या प्रतिमेकडे अधिक लक्ष द्या. कुणाचीही खिल्ली उडवू नका. छोट्या गोष्टींना महत्त्व देणे टाळा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. काम खराब करण्याचा प्रयत्न केला जाईल. नोकरदार लोकांसाठी हा महिना शुभ राहिल. ठरवलेल्या योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना तुमच्यासाठी संमिश्र ठरेल. जोडीदाराला भेटण्यात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला समन्वय राहिल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
धनु – गुंतवणूक करणे टाळा
हा महिना तुमच्यासाठी आपत्ती आणि संधी घेऊन येईल. तुम्ही बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगल्या संधीच सोनं कराल. महिन्याच्या सुरुवातीला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. रोजगाराच्या शोधात असाल तर शोध पूर्ण होईल. नोकरीत असलेल्या लोकांना पदोन्नती किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खाण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवा. कर्ज घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी अचानक मोठ्या खर्चांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना समस्या येतील. बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे बाहेर येतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलदायी ठरतील. गुंतवणूक करणे टाळा. प्रेम जीवनात गैरसमज निर्माण होतील. संवादातून समस्या सोडवा.
मकर – संपत्ती वाढ होईल.
मकर राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना संमिश्र असणार आहे. मालमत्ता संबंधित निकाल तुमच्या बाजूने लागणार आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हा महिना लकी ठरेल. मेहनतीचे अपेक्षित फळ मिळू शकते. परदेशात जाऊन करिअर करण्याचा विचार करत असाल तर सर्व अडथळे दूर होतील. नोकरदार महिलांसाठी हा काळ शुभ असेल. काही विशेष कामगिरीमुळे तुमचा मान वाढेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. आरोग्याच्या संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुलांशी संबंधित काही चिंता तुम्हाला त्रास देतील. काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. पैशांची कमतरता भासेल. गुंतवणूक करणे किंवा कर्ज देणे टाळा. प्रेमाच्या नात्यात कडू- गोडपणा येईल. लव्ह पार्टनरकडून सरप्राईज गिफ्टही मिळू शकते. विवाहित लोकांच्या जीवनात प्रेम आणि सौहार्द राहील.
कुंभ – व्यवसायात नफा मिळेल
नोव्हेंबर महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि अभ्यासात काही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. या काळात विद्यार्थ्यांचे मन विचलित होऊ शकते. नोकरदार लोकांना जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांचा रोष सहन करावा लागेल. तुमचे काम दुसऱ्यावर सोपवू नका. मुलांशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्या चिंतेचे कारण बनेल. भावंडासोबत मतभेद होतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या मदतीने परिस्थिती हाताळू शकाल. कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. खूप दिवसांपासून चैनीशी संबंधित एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. संपत्तीत वाढ होऊ शकते. मिळालेल्या यशामुळे अहंकार येऊ देऊ नका. प्रेमसंबंधात येणारे सर्व अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत प्रेम आणि सौहार्द राहिल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाला जाऊ शकता.
मीन – गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या
मीन राशीच्या लोकांना या महिन्यात कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला तुमचे ध्येय वेळेवर साध्या करावे लागणार आहे. नोकरदार लोकांना घर आणि काम सांभाळण्यात अडचणी येतील. मालमत्ता खरेदी करणारे वादात अडकू शकतात. आरोग्याच्या चिंता वाढू शकतात. वेळीच काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचे मत घेणे आवश्यक ठरेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. वेळेचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करा. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वत:ला दूर ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी संवाद साधला तर फायदा होईल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याची चूक करु नका. या काळात वाहन जपून चालवा, दुखापत होण्याची शक्यता आहे. प्रेमाच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. जोडीदारासोबत काही विषयावर मतभेद होऊ शकतात.