Nandurbar Accident News: साक्री तालुक्यातील भामेर येथील मेंढपाळ तुकाराम लक्ष्मण गोवकर (वय ५०) हे मेंढ्यांचे कळप घेऊन नंदुरबार ते नवापूर रस्त्याने जात होते.
हायलाइट्स:
- नंदुरबार ते नवापूर रस्त्यावर भीषण अपघात
- भरधाव बसची रस्त्यावर चालणाऱ्या मेढ्यांना धडक
- १३ मेंढ्या जागीच ठार
या अपघातात १३ मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या तर काही मेंढ्या जखमी झाल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तुकाराम लक्ष्मण गोवकर नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एसटी बस चालक सखाराम भावसिंग कोकणी (नंदुरबार आगार) याच्याविरुद्ध भा न्या.सं. चे कलम २८१, ३२५, १२५ (अ), (ब), सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. काशिनाथ साळवे करत आहेत.
दरम्यान, असाच काहीसा भीषण अपघात काही दिवसांपूर्वी घडला होता. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एका भरधाव ट्रकने मेंढ्यांना चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत तब्बल शंभरहून अधिक मेंढ्या ठार झाल्या होत्या. रस्त्यावर अक्षरश: मृत पावलेल्या मेंढ्यांचा खच होता. भरधाव ट्रक वेगाने रस्त्यावर जात असलेल्या मेंढ्यांना चिरडल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या दुर्घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.