Sunil Shelke Maval Vidhan Sabha Constituency : मावळ विधानसभेचे उमेदवार सुनील शेळके यांनी त्यांना विरोध केला जात असल्याचं म्हणत विरोधकांवर चांगलाचा हल्लाबोल केला आहे.
मला विरोध करण्यासाठी संपूर्ण भेगडे एकत्र – सुनील शेळके
मावळ तालुक्यातील उर्से येथे सुनील शेळके यांनी कोपरा सभेमध्ये विरोधकांवर चांगलाचा हल्लाबोल केला. मला विरोध करण्यासाठी संपूर्ण भेगडे एकत्र झाल्याचा देखील सुनील शेळके म्हणाले आहेत. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री होण्यासाठी मावळचे स्थानिक भाजप नेते माहितीचं काम करतील, असा विश्वास देखील सुनील शेळके यांनी व्यक्त केला आहे.
राज्यामध्ये सध्या मावळ पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होऊन देखील मावळच्या स्थानिक भाजपच्या नेत्यांनी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेने आपण महायुतीचे काम करणार असल्याचं, खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आहे.
मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सोमोरं जाणार – सुनील शेळके
गेल्या पाच वर्षांमध्ये माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्याचे परिणाम मला आजही भोगावे लागत आहेत. दादा पोलीस घेऊन फिरावे लागत आहे. मात्र, माझ्या जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास त्यामुळे मी असाच पुढे जात राहणार आहे, असंही ते म्हणाले.
Pune News : मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन
गेल्या पाच वर्षांमध्ये मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मी निवडणुकीला सामोरे जात आहे. तसंच महायुतीच्या सरकारमध्ये मावळची जागा ही राष्ट्रवादीला सुटल्याने महायुतीचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. विरोधक फक्त मी भेगडे नाही म्हणून मला विरोध होत असल्याचं, सुनील शेळके यांनी सांगितलं आहे.