दोन ठिकाणी पाडवा झाल्यामुळे लोकांचा वेळ वाचतो, गर्दी विखुरली जाते; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

Ajit Pawar On Diwali Padwa : अजित पवार यांनी आज काटेवाडीत अने कार्यकर्त्यांसह दिवाळी पाडवा साजरा केला. यावर्षी दोन ठिकाणी पाडवा साजरा झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दीपक पडकर, बारामती : जुन्या लोकांना माहिती आहे, पहिल्यापासून काटेवाडीतल्या घरीच पाडव्यानिमित्त लोक भेटायला येत होते. नंतर गोविंद बागेतील जमीन घेतल्यावर आणि तिथे घर बांधल्यानंतर तिथे पाडव्यानिमित्त लोक भेटायला येऊ लागले, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बारामतीतील काटेवाडी येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी प्रथमच पाडव्यानिमित्त भेटीगाठीचा कार्यक्रम पार पडला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
Rohit Pawar : साहेबांनी पाडवा सुरू केला, त्यांचं बोट धरून अजितदादा आले; आता शरद पवार जिथे उभे राहतात, तिथेच लोक भेटायला जातात

अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

पुढे बोलताना पवार म्हणाले, आज पाडव्यानिमित्त राज्याच्या काना-कोपऱ्यातील कार्यकर्ते भेटण्यासाठी आले. त्यामुळे एक प्रकारचा हुरुप आला. पाडव्यानिमित्त भेटायला आलेल्या लाडक्या बहिणीची संख्या देखील लक्षणीय होती. पाडव्यानिमित्त आलेली लोकं उस्फूर्तपणे आणि स्वयंप्रेरणेने आली होती. यामध्ये शेतकरी देखील होता. दोन ठिकाणी पाडवा झाल्यामुळे लोकांचा वेळ वाचतो, गर्दी विखुरली जाते, त्यामुळे लोकांना देखील पाडव्यानिमित्त लवकर घरी जाता येतं, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणार? सी-व्होटर सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीसाठी खुशखबर, जनतेचा कल कुणाकडे?

बारामतीकर माझ्या पाठीशी उभे राहतील, उपमुख्यमंत्र्यांना विश्वास

बारामतीकरांचा माझ्यावर विश्वास आहे, ते नक्कीच माझ्या पाठीशी उभे राहतील. काल मी बारामतीचा धावता दौरा केला. प्रत्येक गावात मी तीन ते चार तास उशिराने पोहोचत होतो. तरी देखील प्रत्येक गावामध्ये मला चांगला प्रतिसाद मिळाला. महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे आमचं एकमेव लक्ष आहे. त्यानंतर नेता कोण असेल हे ठरवले जाईल. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, त्यांच्यासोबत उद्या चर्चा होईल आणि त्यांना माघार घेण्याबाबत सांगण्यात येईल. आमची लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. बारामतीमध्ये केलेल्या दौऱ्यात अनेक ठिकाणी महिलांचा उत्साह दिसून आला, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
Pune News : मावळमध्येही सांगली पॅटर्न, दादा गटाच्या आमदाराची कोंडी; सुनील शेळकेंनी सोडलं मौन

Baramati News : दोन ठिकाणी पाडवा झाल्यामुळे लोकांचा वेळ वाचतो, गर्दी विखुरली जाते; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

हे आरोप बिन बुडाचे…

पोलिसांच्या गाड्यांमधून पैसे पुरवले जातात हे आरोप बिन बुडाचे आहेत. या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांच्या सुद्धा गाड्या तपासण्यात याव्यात. निवडणूक आयोग यंत्रणेला अशा पद्धतीने सर्व गाड्यांची तपासणी करण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जेष्ठ नेते शरद पवार यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

ajit pawar katewadi diwali padwabaramati newssharad pawar govind baug diwali padwaअजित पवार काटेवाडी दिवाळी पाडवाअजित पवार दिवाळी पाडवागोविंद बाग बारामती शरद पवार दिवाळी पाडवाबारामती अजित पवारशरद पवार दिवाळी पाडवा
Comments (0)
Add Comment