पुढल्या वर्षी भाऊबीज एकत्र, पण पाडवा…; पार्थ पवारांकडून भविष्यातील राजकारणाचे स्पष्ट संकेत

Parth Pawar: बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे साजरे करण्यात आले आहेत. एक पारंपरिक पद्धतीने गोविंद बागेत, तर दुसरा काटेवाडी येथील अजित पवारांच्या बंगल्यावर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे: बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे साजरे करण्यात आले आहेत. एक पारंपरिक पद्धतीने गोविंद बागेत, तर दुसरा काटेवाडी येथील अजित पवारांच्या बंगल्यावर. त्यामुळे बारामतीकरांसाठी हा चर्चेचा विषय ठरला आहे, कारण कोणत्या पाडव्याला किती गर्दी होते, हे पाहणेच आता औत्सुक्याचे ठरले आहे. मात्र, काटेवाडीत पाडवा मेळावा झाल्यामुळे शरद पवार यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर काटेवाडीत पाडवा मेळावा का घ्यावा लागला, याबद्दल सविस्तर माहिती पार्थ पवार यांनी दिली.

शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शक्तिप्रदर्शनाच्या दृष्टीने पहिला मोठा जाहीर कार्यक्रम दसरा मेळावा ठरला. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे शिवाजी पार्क आणि बीकेसी ग्राउंडवर पार पडले. त्यानंतर दोन्ही दसरा मेळाव्यांची परंपरा सुरू झाली. त्याचप्रमाणे काटेवाडीत देखील दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू राहील, असे पार्थ पवारांनी सांगितले.
तो कार्यकर्ताच नाही! शहांचा ‘तो’ किस्सा भाजप नेतेच विसरले; समजूत काढताना फडणवीसांची दमछाक
पक्ष फुटल्यानंतर आम्ही दिवाळी पाडव्याला हजेरी लावली नव्हती. त्यानंतर पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी, वरिष्ठ नेते, तसेच कमिटीच्या बैठकीत ठरून हा दिवाळी पाडवा साजरा करण्याचे ठरवले. पहिल्याच पाडव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यापूर्वी दिवाळी पाडवा काटेवाडीतच साजरा होत असे, नंतर तो गोविंद बागेत साजरा करण्यात आला. हे नवीन वर्ष आहे म्हणून हे वेगळं वाटतं आहे; मात्र पुढील वर्षी याला निश्चितच मान्यता मिळेल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा आम्ही पाडव्याला भाऊबीज साजरी केली नाही, पण पुढच्या वर्षी भाऊबीज साजरी करू. पाडवा हा मात्र वेगळाच राहील, असे पार्थ यांनी स्पष्टपणे सांगितले.
Manoj Jarange Patil: खोला ते! शिंदेंचा आमदार खोका घेऊन जरांगेंच्या भेटीला; पाटलांनी लगेच उघडायला लावला अन् मग…
उद्या भाऊबीजेच्या दिवशी अजित पवार बारामतीत गावभेटीवर होते. सकाळी ७ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. त्याची सांगता रात्री आठ वाजता होईल. त्यामुळे अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीज करण्याची शक्यता मावळली आहे. सुप्रिया सुळे उद्या संध्याकाळी ४ वाजता कोल्हापूरला पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रवाना होणार आहेत.

Source link

Maharashtra Political NewsMaharashtra politicsPawar familypawar family riftअजित पवारपवार कुटुंबपार्थ पवारमहाराष्ट्र राजकीय बातम्याराष्ट्रवादी कॉंग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment