मुख्यमंत्री शिंदे प्रचाराचा शंख फुंकणार! महायुतीच्या प्रचारासाठी शिंदेंची आघाडी, सभेची तारीख आणि वेळही ठरली

CM Ekanth Shinde Campaign Rally: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत प्रचारात आघाडी घेणार आहेत. राज्यातील सर्वात मोठा तसेच शिवसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. यासाठी तारीख आणि जागाही ठरली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीत प्रचारात आघाडी घेणार आहेत. राज्यातील सर्वात मोठा तसेच शिवसेनेचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या बालेकिल्ल्यातून नामांकन दाखल केले आहे. असे असले तरी शिंदे प्रचाराचा शुभारंभ मात्र शिवसेनेच्या जीवाभावाच्या मुंबईतून करणार आहेत. उद्या अंधेरी पूर्व येथे शिवसेनेची पहिली प्रचार सभा पार पडणार आहे. शिवसेनेचे अंधेरी पूर्वचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचारासाठी शेरे पंजाब मैदानात शिंदेंची सभा होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
महायुतीकडून सरवणकरांना नवी ऑफर, विचार सुरु; उमेदवारी अर्ज माघारी घेणार?
दरम्यान शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुतीच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या या पहिल्या प्रचार सभेतून मुख्यमंत्री कोणते मुद्द्यांवर भर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यातील वाद मिटला आहे. महायुतीमध्ये भाजपच्या पारड्यात जास्त जागा पडल्या आहेत, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच मोठा भाऊ ठरला आहे. तरी बंडखोरांमुळे मात्र वरिष्ठांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. असे असतानाही राज्यात दिवाळीनंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

cm ekanth shindemh vidhan sabha nivadnukMumbai shivsenashivsena campaign rallyमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचारमुंबईत शिवसेना कोणाचीमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनेची प्रचार सभा
Comments (0)
Add Comment